PAN–Aadhaar Linking डेडलाईन संपली! तुमचे PAN Card Inactive झाले आहे का?

PAN कार्ड Active आहे की Inactive, हे तपासण्यासाठी आयकर विभागाने ऑनलाइन, सोपी आणि जलद प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे
Aadhar Linking to PAN Card
‘आधार–पॅन लिंकिंग’
Published on

नवी दिल्ली: नवीन वर्षाची सुरुवात होताच कोट्यवधी पॅनकार्डधारकांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय — आपलं PAN कार्ड अजूनही सक्रिय आहे ना? यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. PAN आणि Aadhaar लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 होती आणि ही मुदत आता संपली आहे. विशेष म्हणजे, सरकारकडून अद्याप कोणतीही मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली नाही.

यामुळे ज्या नागरिकांनी ठरलेल्या वेळेत PAN–Aadhaar लिंक केले नाही, त्यांचे PAN कार्ड इनअ‍ॅक्टिव्ह (निष्क्रिय) झाले असण्याची दाट शक्यता आहे. मात्र घाबरण्याची गरज नाही. तुमचे PAN कार्ड सक्रिय आहे की निष्क्रिय, हे तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत ऑनलाइन तपासू शकता.

31 डिसेंबर 2025 नंतर PAN स्टेटस तपासणे का आवश्यक?

आयकर विभागाच्या नियमानुसार, जर PAN आणि Aadhaar लिंक झाले नसेल तर संबंधित PAN कार्ड निष्क्रिय घोषित केले जाते. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आर्थिक आणि सरकारी व्यवहारांवर होतो.

31 डिसेंबर 2025 ची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतरही कोणतीही मुदतवाढ न दिल्याने, प्रत्येक PAN कार्डधारकाने आपला PAN स्टेटस तात्काळ तपासणे अत्यंत गरजेचे आहे.

Aadhar Linking to PAN Card
2 कोटींहून अधिक आधार कार्ड ब्लॉक! UIDAI चा मोठा निर्णय

PAN Card Inactive झाल्यास कोणत्या अडचणी येऊ शकतात?

जर तुमचे PAN कार्ड निष्क्रिय झाले असेल तर तुम्हाला खालील गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो:

  • इनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करता येणार नाही आणि टॅक्स रिफंडही मिळणार नाही

  • नवीन बँक खाते किंवा डीमॅट खाते उघडण्यात अडचणी

  • मोठ्या किंमतीच्या वस्तू (घर, वाहन, दागिने) खरेदी करता येणार नाहीत

  • डेबिट व क्रेडिट कार्डशी संबंधित व्यवहार रखडू शकतात

  • बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा/काढणे कठीण

  • पासपोर्ट, सरकारी अनुदान व सबसिडी मिळवण्यात अडथळे

  • जुने PAN कार्ड हरवले किंवा खराब झाले तर नवीन PAN काढणेही अवघड, कारण Aadhaar अनिवार्य आहे

तुमचे PAN Card Active आहे की Inactive? असे तपासा स्टेटस

PAN कार्डचा स्टेटस तपासण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त तुमच्याकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे:

  • PAN नंबर

  • PAN शी लिंक असलेला मोबाइल नंबर

PAN Card Status Check Online – Step-by-Step प्रक्रिया

आयकर विभागाच्या अधिकृत ई-फाइलिंग वेबसाइटला भेट द्या:
https://www.incometaxindiaefiling.gov.in

होम पेजवरील Quick Links विभागात
“Verify PAN Status” या पर्यायावर क्लिक करा

नवीन पेजवर खालील माहिती भरा:

  • PAN नंबर

  • नाव

  • जन्मतारीख

  • PAN शी लिंक असलेला मोबाइल नंबर

Continue या बटणावर क्लिक करा

तुमच्या मोबाइलवर आलेला OTP टाका आणि Validate वर क्लिक करा

स्क्रीनवर लगेच तुमच्या PAN कार्डचा संपूर्ण स्टेटस दिसेल —
PAN Active आहे की Inactive, हे स्पष्टपणे नमूद केलेले असेल

Aadhar Linking to PAN Card
नवे आधार ॲप : आता QR स्कॅनद्वारे माहिती शेअरिंग

PAN–Aadhaar लिंकिंगची मुदत संपल्यानंतर निष्क्रिय PAN कार्डमुळे अनेक आर्थिक व कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उशीर न करता आजच तुमचा PAN स्टेटस तपासा आणि आवश्यक असल्यास पुढील प्रक्रिया पूर्ण करा. काही मिनिटांचा हा ऑनलाइन तपास तुमचे मोठे नुकसान टाळू शकतो.

Banco News
www.banco.news