दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचा राज्यस्तरीय गौरव!

५०० ते १००० कोटी ठेवींच्या गटात महाराष्ट्रात पटकावला तृतीय क्रमांक; 'महाराष्ट्र अर्बन को-ऑपेरेटिव्ह बँक फेडरेशन'चा मानाचा पुरस्कार प्राप्त
Deolali Vyapari Bank state level 3rd rank - Nashik Road latest news
NAFCUB च्या अध्यक्षांच्या हस्ते सोहळ्यात पुरस्कार प्रदान.
Published on

सहकार क्षेत्रातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि., नाशिकरोड (NDVS Bank Ltd.)' च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपेरेटिव्ह बँक फेडरेशनतर्फे आर्थिक वर्ष २०२५–२६ साठी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय उत्कृष्ट बँक पुरस्कारांमध्ये बँकेने रु. ५०० ते १००० कोटी ठेवी असलेल्या गटात संपूर्ण महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

मुंबई येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने बँकेला गौरविण्यात आले. बँकेच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून व सहकार वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हा मानाचा पुरस्कार 'नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपेरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटिज' (NAFCUB) चे अध्यक्ष मा. श्री. लक्ष्मीदासजी तसेच 'महाराष्ट्र अर्बन को-ऑपेरेटिव्ह बँक्स फेडरेशन' चे अध्यक्ष मा. श्री. अजयजी ब्रम्हेचा यांच्या शुभहस्ते बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत उत्साहात स्वीकारला.

या सोहळ्यास बँकेचे अध्यक्ष श्री. निवृत्ती विठोबा अरिंगळे, ज्येष्ठ संचालक श्री. दत्ता गायकवाड, उपाध्यक्षा सौ. कमल आढाव, जनसंपर्क संचालक श्री. नितीन खोले यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सन्माननीय मान्यवर, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deolali Vyapari Bank state level 3rd rank - Nashik Road latest news
नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेला स्वतंत्र 'IFSC Code'

हा पुरस्कार केवळ एक सन्मान नसून, बँक प्रशासनाने जपलेली आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि अत्याधुनिक ग्राहकसेवेचे फलित आहे. बँकेच्या या यशावर बोलताना अध्यक्ष श्री. निवृत्ती अरिंगळे यांनी भावना व्यक्त केल्या:

"हा पुरस्कार म्हणजे आमचे सभासद, ग्राहक, हितचिंतक आणि शुभेच्छुकांनी बँकेवर दाखवलेल्या दृढ विश्वासाची आणि संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र मेहनतीची पावती आहे. 'सहकारातून समृद्धीकडे' या तत्त्वावर निष्ठा ठेवून आम्ही यापुढेही ग्राहकांना अधिक सक्षम आणि डिजिटल सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत."

बँकेच्या स्थापनेपासूनच नाशिक परिसरातील व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीमध्ये दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेने महत्त्वाचे योगदान दिले आहे. रु. ५०० ते १००० कोटी ठेवींच्या गटामध्ये मिळवलेला हा राज्यस्तरीय गौरव बँकेच्या भक्कम आर्थिक स्थितीची आणि उत्तम व्यवस्थापनाची साक्ष देतो.

'एकत्र येऊ, पुढे जाऊ!' या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत बँकेने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Banco News
www.banco.news