जनता सहकारी बँक लि.,येवला येथे सभासदांना लाभांश वाटप

४,२३४ सभासदांना २३.८४ लाख रुपयांचा लाभांश; सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण
जनता सहकारी बँक लि.
येवला येथील जनता सहकारी बँक लि.च्या वतीने सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सहायक निबंधक श्री. विजयसिंग राजपूत, संस्थापक चेअरमन श्री. अंबादास बनकर व उपस्थित मान्यवर.
Published on

येवला (जि. नाशिक) – येथील जनता सहकारी बँक लि., येवला यांच्या वतीने आर्थिक वर्ष २०२४–२५ साठी सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बँकेने आपल्या ४ हजार २३४ सभासदांना एकूण २३ लाख ८४ हजार २९८ रुपये इतक्या लाभांशाचे वाटप जाहीर केले असून, त्याचे वितरण औपचारिकरित्या सुरू करण्यात आले.

जनता सहकारी बँक लि.
जनता सहकारी बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

या लाभांश वाटप कार्यक्रमाला येवल्याचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) श्री. विजयसिंग राजपूतसहायक अधिकारी श्री. रविंद्र शेजवळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक चेअरमन श्री. अंबादास बनकर होते.

यावेळी बोलताना श्री. विजयसिंग राजपूत यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत समाधान व्यक्त करत, बँकेच्या संचालक मंडळाच्या पारदर्शक व शिस्तबद्ध कारभाराचे विशेष कौतुक केले. सभासदांचा वाढता विश्वास, नियोजनबद्ध कर्जवाटप आणि आर्थिक शिस्त यामुळे जनता सहकारी बँक सातत्याने प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जनता सहकारी बँक लि.
जनता सहकारी बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक चेअरमन अंबादास बनकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बँक सातत्याने प्रगतीपथावर आहे. रिझर्व्ह बँक व सहकार विभागाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच बँकेचे कामकाज सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातही सभासदांच्या हिताला प्राधान्य देत बँक अधिक सक्षम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात नैमित्तिक रिक्त झालेल्या संचालक पदावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित संचालक श्री. रावसाहेब राधाकृष्ण कुऱ्हाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभासद व उपस्थितांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले.

लाभांश वितरणामुळे सभासदांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण दिसून आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बँकेच्या प्रशासन व कर्मचाऱ्यांनी केले.

कार्यक्रमास बँकेचे व्हा.चेअरमन श्री. ओंकारेश्वर कलंत्री, ज्येष्ठ संचालक श्री. नंदकुमार अट्टल, तसेच संचालक श्री. अनिलकुमार पटेल, श्री. अशोक कुळधर, श्री. माधवराव बनकर, श्री. सोपानराव पवार, श्री. विनोद बनकर, श्री. अशोक शिंदे, श्री. कृष्णा जानराव, श्री. साहेबराव देशमाने, श्री. किरण बनकर, श्री. गणपत लहरे, श्री. श्रीकांत बाकळे, संचालिका सौ. कविता लहरे, सौ. जयश्री काळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणजित गुंजाळ, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

Banco News
www.banco.news