जनता सहकारी बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

व्याज, कर्जहप्ते नियमित भरून सहकार्य करा: अंबादास बनकर
जनता सहकारी बँक
संस्थापक श्री चेअरमन अंबादास बनकर व उपस्थित मान्यवर
Published on

येवला तालुक्यातील जनता सहकारी बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक चेअरमन अंबादास बनकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली. सभेत बँकेचे संस्थापक चेअरमन अंबादास बनकर यांनी "जनता बँकेचे सभासद, कर्जदारांनी आपल्या कर्जाचे व्याज व हप्ते वेळेवर भरून बँकेस सहकार्य करावे," असे आवाहन केले. आणि बँकेच्या एकूण ठेवी ७८ कोटी रुपये असून कर्जवाटप ४९ कोटी झालेले आहे. बँकेची गुंतवणूक ३८ कोटी असून राखीव व इतर निधी ११ कोटी इतका आहे. दि. ३१ मार्च २०२५ अखेरचा ढोबळ नफा २ कोटी ५ लाख रुपये झाल्याची माहिती श्री. बनकर यांनी दिली.

जनता सहकारी बँक
जनता अर्बन को-ऑप बँक,वाईची सभा उत्साहात

त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित गुंजाळ यांनी बँकेस ऑडिट 'अ' वर्ग मिळाल्याचे नमूद करीत बँकेची स्थिती मजबूत असल्याचे सांगितले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चेअरमन बनकर व संचालक मंडळाने दिली.

जनता सहकारी बँक
देशात नवीन २४० जिल्हा सहकारी बँक उभाराव्यात : नाबार्ड

याप्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन ओंकारेश्वर कलंत्री, संचालक नंदकुमार अट्टल, अनिल कुमार पटेल, माधवराव बनकर, सोपानराव पवार, विनोद बनकर, अशोक कुळधर, कृष्णा जानराव, अशोक शिंदे, राधाकृष्ण कुऱ्हाडे, साहेबराव देशमाने, श्रीकांत बाकळे, किरण बनकर, गणपत पाटील, जयश्री काळे, कविता लहरे यांसह रामेश्वर कलंत्री, रामेश्वर अट्टल, आशुतोष पटेल, माणिकराव वाघ, मधुकर शिंदे, सोपान सातपुते, कारभारी त्रिभूवन, आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा यशस्वितेसाठी नंदकुमार काळे, संजय साताळकर, राजेंद्र वाबळे, रविंद्र जाधव, संजय बोराडे, भानुदास जाधव, अनिल वडनेरकर, पांडुरंग पवार, संदीप गायकवाड, अनिल गायकवाड आदी कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

Banco News
www.banco.news