भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था ठरणार !

२०२५ मधील जगातील टॉप १० अर्थव्यवस्था
अर्थव्यवस्था
अर्थव्यवस्था
Published on

२०२५ मध्ये जगातील मोठ्या १० अर्थव्यवस्थेत कोणत्या देशांचा समावेश आहे? भारत या यादीत कोणत्या स्थानावर आहे, तुम्हाला माहिती आहे का? चला तर येथे जाणून घेऊया

अर्थव्यवस्था
राष्ट्रीय सहकार धोरण : ग्रामीण अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाचा रोडमॅप

सध्या भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि गेल्या १० वर्षांत तिचा नाममात्र जीडीपी १००% वाढला आहे! तरीही, आयएमएफच्या २०२५ च्या अंदाजानुसार, जगातील सर्वात मोठ्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनचा जीडीपी अनुक्रमे ७.३ पट आणि ४.६ पट असेल.

सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत आहे! मात्र, आयएमएफच्या मते, २०२५ मध्ये भारताचा नाममात्र जीडीपी ४,१८७.०१७ अब्ज डॉलर्स असण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२५ मध्येच भारत जपानला मागे टाकून चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तर येत्या काही वर्षांत, तो जर्मनीला मागे टाकून जगातील टॉप १० सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येईल. आयएमएफच्या अंदाजानुसार २०२८ मध्ये भारत ५,५८४.४७६ अब्ज डॉलर्सच्या जीडीपीसह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आयएमएफच्या आकडेवारीनुसार २०२५ मधील टॉप १० अर्थव्यवस्था (नाममात्र जीडीपी):

अर्थव्यवस्था
यंदा भारताचा विकास दर लक्षणीय राहील : आयएमफ

१. अमेरिका – $३०,५०७.२ अब्ज

२. चीन – $१९,२३१.७ अब्ज

३. जर्मनी – $४,७४४.८ अब्ज

४. भारत – $४,१८७.० अब्ज

५. जपान – भारतानंतर पाचव्या स्थानावर

६ युनायटेड किंग्डम- $३८३९.१८ अब्ज

७. फ्रान्स- $३,२११.२९२ अब्ज

८. इटली- $२,४२२.८५५ अब्ज

९. कॅनडा- $२,२२५.३४१ अब्ज

१०.ब्राझील- $२,१२५.९५८ अब्ज

Banco News
www.banco.news