
गडहिंग्लज: येथील दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप. बँकेची ७५ वी अमृत महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच श्री जयसिध्देश्वर आश्रम बेलबाग, वडरगे रोड, गडहिंग्लज येथे बँकेच्या सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांच्या विक्रमी उपस्थितीत अत्यंत थाटामाटात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पावसाची संततधार असूनही सभासदांनी आपल्या जिव्हाळ्याच्या, आपुलकीच्या बँकेच्या सर्वसाधारण सभेस मोठी उपस्थिती लावली होती हे विशेष.
गडहिंग्लज नगराची तसेच गडहिंग्लज तालुक्यातील बहुसंख्य सभासद, ग्राहकांची मुख्य अर्थवाहिनी म्हणून नावारुपास आलेली तसेच गडहिंग्लज आणि गडहिंग्लज तालुक्याच्या विकासामध्ये बहुमूल्य योगदान देणाऱ्या या बँकेच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात गडहिंग्लज पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री काळभैरव, श्री गणेशमूर्तीच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर बँकेचे जनरल मॅनेजर (इनचार्ज) श्री. सुनिल हत्ती यांनी बँकेच्या अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रध्दांजली वाहण्याचा ठराव मांडला. त्यानंतर संचालक श्री. रमेश पाटीलसर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असलेल्या सर्व सभासद, ठेवीवर, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांचे स्वागत केले. प्रास्ताविकपर भाषणात बँकेला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यात साहाय्य्य केलेल्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.
त्यानंतर बँकेचे चेअरमन श्री. जितेंद्र नाईक यांनी आपल्या मनोगतामध्ये बँकेच्या चौफेर प्रगतीचा आढावा घेतला. बँकेला सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात ४ कोटी ५२ लाख इतका विक्रमी नफा मिळाल्याचे सांगून बँकेकडे १९० कोटी ठेवी असून, रु. १३३ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. बँकेने इतर विविध बँकामध्ये ७१ कोटींची गुंतवणूक केलेचे सांगून बँकेने केलेल्या या विक्रमी प्रगतीची तपासणी लेखापरीक्षकांकडून होवून त्यांनी बँकेस अ वर्ग दिल्याचे सांगितले. हे यश तुम्हा सर्वांच्या सहकार्याने प्राप्त झाल्याचे सांगून त्यांनी सभासदांना लाभांश देण्याचे घोषित केले. तसेच कर्मचाऱ्यांना भरीव पगारवाढ व बोनसही दिल्याचे जाहीर केले. तसेच बँकेने सभासद, ठेवीदार व ग्राहकांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगून लवकरच मोबाईल बँकिंग सेवा सुरु करणार असल्याचे सांगितले. सभासद, ठेवीदार यांचे ठेवीवर ९.९२ टक्के इतक्या उच्चतम् परताव्याने व्याजदर देणारी महाराष्ट्रातील आमची एकमेव बँक असलेने सांगून, मार्च २०२६ अखेर २५० कोटी ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
त्यानंतर विषय पत्रिकेचे वाचन श्री. हत्ती यांनी केले. विषय पत्रिकेवरील संपूर्ण १ ते १३ विषयांना उपस्थित सर्व सभासदंनी एकमताने टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. सभेस बँकेचे माजी चेअरमन श्री. नीलकंठ हिरेमठ, काशिनाथ घुगरी, बाळासाहेब घुगरे, सतिश पाटील,अरुण कलाल, लक्ष्मण पोवार तसेच माजी संचालक श्री. अमरनाथ घुगरी, किशोर हंजी, उदय जोशी, विकासआण्णा पाटील, करंबळी, पंडीतराव जोशी,आप्पासाहेब पाटील, राजेंद्र रुद्रापगोळ, बसवराज आजरी, बाबासाहेब पाटील, तम्मा बोरगांवे, जवाहर घुगरे, विठ्ठल भम्मानगोळ आदी उपस्थित होते. उपस्थित सभासदांपैकी राजेश कदम, सरपंच कणेरी, श्री. बाळासाहेब मंचेकर, अझर बोजगर, वैभव माळवे, भारत जाधव, युवराज जाधव, नवाब मालदार, बाळासाहेब भैस्कर, गडहिंग्लजचे प्रदीप संकपाळ व मदकरी, राहुल घुगरे, राहुल शिरकोळे, पाटील समाजाचे बी. बी. पाटील, नितिन देसाई इत्यादीनी चेअरमन श्री. जितेंद्र नाईक व सहकारी संचालकानी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार केला. बँकेचे संचालक श्री. राजशेखर दड्डी यांनी सर्वांचे आभार मानले व सभा संपलेचे जाहीर केले.