भारतातील पहिली नोट किती रुपयांची होती?

जाणून घेऊया नोटांच्या निर्मितीचा रंजक इतिहास
first indian banknote
first indian banknote
Published on

पहिली नोट कधी व कोणी छापली याची माहिती घेण्याआधी नोटांची गरज कशी निर्माण झाली हे पाहूया - पूर्वी मानवाच्या गरजा जसजशा वाढल्या तसे प्रथम त्याने आपल्याकडे जास्तीच्या असलेल्या वस्तू आपल्याला हवी असलेली वस्तू ज्याच्याकडे आहे त्याला देऊन ती वस्तू घेतली जायची. याला वस्तुविनिमय म्हणत असत. या बाजारात लोक आपल्याकडे असलेल्या वस्तू घेऊन येत आणि आपल्याला हवी असलेली वस्तू ज्याच्याकडे आहे, त्याला आपल्याकडील वस्तू देऊन त्याच्याकडील वस्तू मिळवत. या व्यवहारांत वस्तूचे मोल निश्चित नसायचे व एखाद्याच्या गरजेच्या तीव्रतेवर त्याच्याकडील जास्त वस्तू पदरात पाडून घेतल्या जायच्या. असे व्यवहार जसजसे वाढले तसे यातील काही लोक लोकांच्या गरजांचा फायदा घेण्यासाठी वस्तूंचा साठा करू लागले. आणि व्यापार सुरु झाला.

first indian banknote
भारतीय चलन: विश्वासाचं आणि सुरक्षिततेचं अद्वितीय प्रतीक

व्यापार जसा वाढला तसे वस्तूंचे मोल ठरवण्याची निकड भासू लागली व चलन माध्यम म्हणून प्रथम नाणी तयार करण्यात आली. त्यामुळे व्यवहारात सुलभता आली. व्यापार वाढू लागल्यानंतर नाण्यांचे ओझे हलके करण्यासाठी प्रथम हुंडी (कागदी दस्त ) तयार झाले आणि मग नोटा तयार करण्यात आल्या. ज्या आज आपण रोखीच्या व्यवहारांत सर्रास वापरतो. चला तर पहिली नोट केव्हा तयार झाली व कोणी तयार केली याचा रंजक इतिहास जाणून घेऊया.

आपल्या देशात भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जेव्हा पहिल्यांदा कागदी नोट जारी केली, तेव्हा ती किती रुपयांची होती ? या प्रश्नाचे उत्तर सर्वानाच चकित करेल; कारण ती अपेक्षेनुसार १, २ किंवा १०० रुपयांची नव्हतीच.

first indian banknote
रिझर्व्ह बँकेचे दोन गव्हर्नर – ज्यांच्या स्वाक्षरीशिवाय नोटा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी झाली. त्यावेळी आपल्या देशावर ब्रिटिशांचे साम्राज्य होते. RBI ने आपल्या स्थापनेच्या तीन वर्षांनंतर, म्हणजेच जानेवारी १९३८ मध्ये, पहिली कागदी नोट जारी केली. ही नोट ५ रुपयांची होती आणि त्यावर ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज सहावा यांचे चित्र होते. त्यानंतर त्याच वर्षी, RBI ने १०, १००, १,००० आणि १०,००० रुपयांच्या नोटाही जारी केल्या. १०,००० रुपयांची नोट मुख्यतः व्यापारी आणि मोठ्या व्यवहारांसाठी वापरली जात होती; पण १९४६ मध्ये ब्रिटिश सरकारने ती बंद केली. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, १९४९ मध्ये RBI ने स्वतंत्र भारताची पहिली नोट जारी केली. ही नोट १ रुपयाची होती. या नोटेवर किंग जॉर्जच्या चित्राऐवजी अशोक स्तंभाचे लायन कॅपिटल (सिंह चित्र) छापण्यात आले होते. ही नोट भारताच्या स्वातंत्र्याचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक बनली. त्यानंतर १९५० मध्ये २, ५, १० आणि १०० रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या.

first indian banknote
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया : देशाच्या आर्थिक अधिष्ठानाची घडण

आज आपण ज्या नोटा वापरतो, त्यावर महात्मा गांधीजींचे चित्र असते; पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे नोटांवर त्यांचे चित्र नव्हते. १९६९ मध्ये, महात्मा गांधींच्या १०० व्या जयंतीनिमित्त, RBI ने पहिल्यांदा १०० रुपयांच्या नोटेवर त्यांचे चित्र छापले. त्यानंतर १९९६ पासून 'महात्मा गांधी सीरिज'च्या नोटांनी जुन्या नोटांची जागा घेतली आणि आज गांधीजींचे चित्र आपल्या चलनी नोटांवर कायम झाले आहे.

Banco News
www.banco.news