UPI Circle Feature: आता कुटुंबीयही तुमच्या खात्यातून करू शकणार UPI पेमेंट

तुमच्या खात्यावर पूर्ण नियंत्रण ठेवत कुटुंबीयांना सुरक्षित आणि मर्यादित UPI पेमेंटची मुभा
BHIM UPI Circle Feature Scan Code Payment
UPI Circle Feature : आता कुटुंबीयही तुमच्या खात्यातून करू शकणार UPI पेमेंट
Published on

डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित, सोपे आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त बनवण्याच्या दिशेने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) अंतर्गत BHIM सर्व्हिसेस लिमिटेडने एक नवे आणि महत्त्वाचे फिचर सादर केले आहे. या नव्या फिचरचे नाव आहे ‘UPI Circle – Full Delegation’.

या सुविधेमुळे आता तुमच्या कुटुंबातील सदस्य किंवा विश्वासू व्यक्ती थेट तुमच्या बँक खात्यातून UPI पेमेंट करू शकतात, तेही स्वतःचे बँक खाते नसतानाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, मुले आणि छोटे व्यावसायिक यांच्यासाठी हे फिचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

‘UPI Circle’ म्हणजे नेमके काय?

‘UPI Circle’ हे एक डेलिगेशन-आधारित फिचर आहे. यामध्ये मुख्य वापरकर्ता (Primary User) आपल्या खात्याशी दुसऱ्या व्यक्तीला सेकंडरी युजर (Secondary User) म्हणून जोडू शकतो.

एकदा परवानगी दिल्यानंतर सेकंडरी युजर मुख्य वापरकर्त्याच्या खात्यातून मर्यादित रकमेपर्यंत UPI पेमेंट करू शकतो.

BHIM UPI Circle Feature Scan Code Payment
UPI ट्रान्झेंक्शन फेल झालं? त्वरित फॉलो करा ‘हे’ स्टेप्स

मासिक मर्यादा आणि सुरक्षितता

या फिचरमध्ये दरमहा कमाल 15,000 रुपयांची खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे. मुख्य वापरकर्ता ही मर्यादा स्वतः ठरवू शकतो.
तसेच ही परवानगी किमान 1 महिना ते कमाल 5 वर्षांपर्यंत वैध ठेवता येते.

विशेष बाब म्हणजे –

  • प्रत्येक व्यवहाराची माहिती मुख्य वापरकर्त्याला त्वरित मिळते

  • मुख्य वापरकर्त्याचे पूर्ण नियंत्रण राहते

  • गरज भासल्यास परवानगी कधीही रद्द करता येते

ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा

अनेक ज्येष्ठ नागरिक आजही डिजिटल पेमेंट करताना संकोच किंवा भीती अनुभवतात. परंतु ‘UPI Circle’मुळे कुटुंबातील सदस्य त्यांच्या वतीने पेमेंटची परवानगी देऊ शकतात. यामुळे औषधे, किराणा किंवा दैनंदिन खर्च सहज व सुरक्षितरीत्या करता येणार आहे.

पालक आणि मुलांसाठी सुरक्षित पर्याय

पालक आता मुलांना पॉकेट मनी किंवा शैक्षणिक खर्चासाठी UPI वापरण्याची परवानगी देऊ शकतात, तीही ठराविक मर्यादेत. त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहील आणि रोख पैशांचा धोका कमी होईल.

BHIM UPI Circle Feature Scan Code Payment
UPI पेमेंट्स आता फेस आयडी, फिंगरप्रिंटवर!

छोटे व्यावसायिक आणि कर्मचारी वापर

छोट्या व्यवसायिकांसाठीही हे फिचर फायदेशीर ठरू शकते. पेट्रोल, टोल, स्टेशनरी किंवा इतर लहान खर्चांसाठी कर्मचारी थेट मालकाच्या खात्यातून पेमेंट करू शकतील, तेही पूर्ण नियंत्रणासह.

UPI Circle फिचर कसे वापरायचे? (स्टेप-बाय-स्टेप)

  1. BHIM App उघडा आणि होम स्क्रीनवरील ‘UPI Circle’ पर्यायावर टॅप करा.

  2. Invite to Circle वर टॅप करून संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर टाका.

  3. Approve Monthly Limit निवडा, नाते निवडा आणि आधारद्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करा.

  4. मासिक खर्च मर्यादा (कमाल ₹15,000) आणि कालावधी (1 महिना ते 5 वर्षे) ठरवा.

  5. बँक खाते निवडा आणि UPI PIN टाकून प्रक्रिया पूर्ण करा.

  6. सेकंडरी युजरने विनंती स्वीकारताच तो तत्काळ पेमेंट सुरू करू शकतो.

‘UPI Circle’ फिचरमुळे डिजिटल पेमेंट आता फक्त वैयक्तिक न राहता कुटुंब-केंद्रित झाले आहे. सुरक्षितता, नियंत्रण आणि वापरात सुलभता यांचा उत्तम मेळ असलेले हे फिचर भारतातील डिजिटल व्यवहारांना नवी दिशा देणारे ठरणार आहे.

Banco News
www.banco.news