UCB, NBFC, डिजिटल पेमेंट्स, MSE कर्ज, REIT कर्जात ऐतिहासिक बदल 
Circular

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय: UCB, NBFC, डिजिटल पेमेंट्स, MSE कर्ज, REIT कर्जात ऐतिहासिक बदल

ग्राहक संरक्षण मजबूत करण्यासाठी, सहकारी बँकांना अधिक स्वातंत्र्य देण्यासाठी आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा ऐतिहासिक निर्णय

Prachi Tadakhe

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आज विकासात्मक व नियामक धोरणांबाबत महत्त्वाचे निवेदन जारी केले आहे. या धोरणांत बँका, नागरी सहकारी बँका (UCB), NBFC, डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशन, वित्तीय बाजार व क्षमताविकास या पाच प्रमुख क्षेत्रांतील 16 मोठ्या सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत.

या बदलांचा थेट परिणाम ग्राहक, लघुउद्योजक, सहकारी बँका, NBFC आणि वित्तीय बाजारांवर होणार आहे.

I. नियामक सुधारणा (Regulations)

1) वित्तीय उत्पादनांच्या जाहिरात व विक्रीसाठी नवे नियम

ग्राहकांची फसवणूक (mis-selling) थांबवण्यासाठी बँका व अन्य RE साठी जाहिरात, मार्केटिंग व विक्रीसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे लवकरच मसुदा स्वरूपात प्रसिद्ध केली जाणार आहेत.

2) कर्ज वसुलीत एकसमान नियम

वसुली एजंटांच्या वापराबाबत असलेले वेगवेगळे नियम आता सुसंगत व एकसमान केले जाणार आहेत.

3) डिजिटल फसवणूक: ग्राहक जबाबदारीचे नवे फ्रेमवर्क

2017 नंतरच्या तंत्रज्ञान बदलांमुळे ग्राहकांची जबाबदारी व भरपाई नियम नव्याने ठरवले जाणार. लघु फसवणुकींसाठीही भरपाईचा आराखडा येणार.

4) REIT ला बँक कर्ज

आतापर्यंत बंद असलेले REIT साठी बँक कर्ज आता परवानगी देण्यात येणार आहे. InvIT प्रमाणेच सुरक्षा अटी लागू असतील.

5) UCB कर्ज नियमांत बदल

UCB साठी:

  • अनसिक्योर्ड कर्ज मर्यादा,

  • नाममात्र सदस्यांना कर्ज,

  • गृहकर्जाचा कालावधी व मोरेटोरियम
    यात सुलभ व टप्प्याटप्प्याने बदल होणार.

6) Type-I NBFC ना दिलासा

₹1,000 कोटींपर्यंत मालमत्ता असलेल्या, सार्वजनिक निधी न वापरणाऱ्या NBFC ना रिझर्व्ह बँक नोंदणीपासून सूट देण्याचा प्रस्ताव.

7) गोल्ड लोन NBFC शाखांसाठी सुलभता

1,000 पेक्षा जास्त शाखा असलेल्या NBFC-ICC साठी आता रिझर्व्ह बँक पूर्वपरवानगीची गरज नाही.

II. पेमेंट सिस्टम

8) डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी नवे उपाय

lagged credits, वरिष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त प्रमाणीकरण यांसारख्या उपायांवर चर्चा पत्र प्रसिद्ध होणार.

III. आर्थिक समावेशन

9) लीड बँक स्कीममध्ये बदल

नवीन मार्गदर्शक तत्त्वे व एकत्रित रिपोर्टिंग पोर्टल सुरू होणार.

10) किसान क्रेडिट कार्ड (KCC) सुधारणा

  • कालावधी 6 वर्षे

  • Scale of Finance शी मर्यादा जोडली

  • तंत्रज्ञान खर्चाचा समावेश

11) बिझनेस करस्पाँडेंट नियम पुनरावलोकन

ग्रामीण व दुर्गम भागातील सेवा अधिक प्रभावी होणार.

12) कोलॅटरल-फ्री कर्ज मर्यादा वाढ

MSE साठी मर्यादा ₹10 लाखांवरून ₹20 लाख (1 एप्रिल 2026 पासून).

IV. वित्तीय बाजार

13) कॉर्पोरेट बाँड डेरिव्हेटिव्ह

Total Return Swaps आणि Credit Index Derivatives सुरू होणार.

14) फॉरेन एक्सचेंज व्यवहारांत सुलभता

Authorized Dealers ना अधिक लवचिकता.

15) VRR मध्ये बदल

VRR गुंतवणूक आता General Route मर्यादेत मोजली जाणार.

V. क्षमताविकास

16) Mission SAKSHAM – UCB साठी

1.40 लाख कर्मचारी प्रशिक्षण, प्रादेशिक भाषांत, डिजिटल व प्रत्यक्ष स्वरूपात.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयांमुळे ग्राहक संरक्षण मजबूत, सहकारी बँकांना बळ, डिजिटल व्यवहार सुरक्षित, व उद्योजकांना स्वस्त कर्ज मिळणार आहे. भारतीय वित्तीय क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

Statement on Developmental and Regulatory Policies.pdf
Preview
SCROLL FOR NEXT