वडगाव कांदळी येथील साईलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन प्रा.श्रीकांत पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेतील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी सभासदांना १५ टक्के लाभांश आणि दिवाळी भेटवस्तू देण्याची घोषणा करण्यात आली.
सभेला व्हाइस चेअरमन रामदास पवार, सचिव पोपट बढे, संचालक मंगेश घाडगे, सतीश पाचपुते, अतुल खेडकर, नीलकंठ भोर, नवनाथ थोरात, ज्ञानेश्वर लांडगे, माउली अडागळे, करीम इनामदार, लता भोर, पूजा मुटके, उत्तम लांडगे, सुनील निलख, मच्छिंद्र भोर, पूजा भोर, स्नेहल बढे यांच्यासह माजी पोलिस उपायुक्त प्रकाशजी लांडगे, फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके, गुलाबशेठ नेहरकर, डी. बी. औटी, दत्तूशेठ भोर, बबन घाडगे, नबाजी घाडगे, अशोक बढे, वैभव काळे, सरपंच उल्काताई पाचपुते, संजय खेडकर, पंढरीनाथ पाचपुते, सुवर्णा मुटके, संगीता भोर, बाळासाहेब पाचपुते, विशाल रेपाळे, अनिल भोर, संदेश पाचपुते, सुरेश बढे, रामदास लिख, आर. डी. पाचपुते, शंकर पाचपुते यांच्यासह सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोपट भोर, सत्यवान थोरात, रंगनाथ पाचपुते, संजय खेडकर, प्रकाशजी लांडगे आणि अमितशेठ बेनके यांनी मनोगत व्यक्त केले. साईलक्ष्मी पतसंस्थेचे सध्या १,५१९ सभासद असून, संस्थेच्या ठेवी १० कोटी ३१ लाख रुपये आणि गुंतवणूक ४ कोटी ४९ लाख रुपये आहे. संस्थेचा स्वनिधी १ कोटी ५० लाख रुपये आहे. सभेचे सूत्रसंचालन सतीश पाचपुते यांनी केले,अहवाल वाचन पोपट बढे यांनी केले, तर रामदास पवार यांनी आभारप्रदर्शन केले.