कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सौ.प्रियंका सुरवसे,एम.एल.जाधव व इतर मान्यवर .. 
Co-op Credit Societies

मांजरा महिला को-ऑप. सोसायटी लातूरचा वर्धापन दिन उत्साहात

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद,सहभागींचा मोफत विमा उतरविला

Pratap Patil

लातूर येथील मांजरा महिला अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटीचा ५ वा वर्धापन दिन मुख्य कार्यालयात नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सौ.प्रियंका सुरवसे होत्या. यानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये संस्थेच्या हितचिंतक व सभासदांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सहभागी सभासदांचा संस्थेमार्फत १ लाख रुपयाचा मोफत विमा उतरविण्यात आला. शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भालचंद्र ब्लड बँक, लातूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सदर कार्यक्रमास माजी स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर तात्या (संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लातूर), अ‍ॅड. किरण जाधव (चेअरमन, विलास को-ऑप. बँक), एम. एल.जाधव (तज्ञ संचालक, साईबाबा बँक), श्रीशैल्य कोरे सर ( सीईओ मल्टीस्टेट ), भागवत सांगवे ( लातूरअर्बन, सीईओ),सुशील जोशी ( लक्ष्मी अर्बन, व्यवस्थापक), सोनू डगवाले (चेअरमन, इंडियन अर्बन सोसायटी), युनूस मसूलदार (चेअरमन, चाकूर अर्बन सोसायटी), शोभाताई पाटील (माजी नगरसेविका), श्वेता लोंढे (मा. नगरसेविका),अ‍ॅड. वैशालीताई लोंढे (समाजसेविका, दिशा प्रतिष्ठान), रागिणीताई यादव (माजी नगरसेविका ),अ‍ॅड. सुनील कांबळे (आंबेडकर सोसायटी चेअरमन, सविता कांबळे (व्हाईस चेअरमन ), सुजाता अजनीकर ( चेअरमन, पीपल्स अर्बन सोसायटी), प्रवीण सूर्यवंशी, प्रवीण एबल (जिल्हाअध्यक्ष, एससी सेल ), अ‍ॅड. विलास कोळेकर, अ‍ॅड. मैत्री कोल्हे, सौ. बबनाबाई देशमुख (चेअरमन, मार्केट सोसायटी), प्रवीण सूर्यवंशी (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस सोशल मीडिया) एम. एल. माळी, शाहिद शेख (व्यवस्थापक, साईबाबा जनता सहकारी बँक),

सौ.प्रियंका सुरवसे,श्री अशोक गोविंदपूरकर तात्याव इतर मान्यवर ..

विश्वेश्वर सहकारी बँक पुणे.चे सर्व अधिकारी, महेश गुळवे, उदय देशपांडे (प्रचिती कंप्यूटर), अर्चना देशपांडे, मंदाकिनी शेटकर, पवन अल्टे, भागवत पाटील (शिवम एजन्सी), हरी भुतडा, बाबुराव सूर्यवंशी, पोपडे कराडप्पा ,पांचाळ सरस्वती, सरस्वती महिला गट, धनलक्ष्मी गट, शिवकन्या गट, राजू राचटे, दीक्षा महिला पाटसाठ, बिराजदार सर, अक्षय सूरवसे, प्राप्ती वाघमारे, तसेच संस्थेचे सभासद मंडळ प्रमुख अप्पा पंढारी, करसबाडे पोपट, विनायक जंगले, मुबिना शेख, चिंचोळी महिला गट, अश्विनी घोडके, प्रभुआप्पा पंचाक्षरी विश्रांती स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी पतसंस्थेच्या कामावर समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

संस्थेच्या वतीने संस्थेच्या चेअरमन सौ.प्रियंका सुरवसे, सचिव सौ. रोहिणी धायगुडे तसेच संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
SCROLL FOR NEXT