पुणे : येथील राजर्षी शाहू सहकारी बँकेचा ४१ वा वर्धापन दिन उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमप्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री. शांताराम धनकवडे यांनी बँकेकडून देण्यात येत असलेल्या ग्राहकाभिमुख सेवांची सविस्तर माहिती दिली. बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. सुधाकर पन्हाळे यांनी बँकेच्या स्थापनेपासून ते आजअखेर झालेल्या बँकेच्या प्रगतीचा आलेख मांडला व जुन्या आठवणींना उजाळा दिला.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बाळासाहेब डोईफोडे यांनी, स्व. आबासाहेब यांनी सहकार व सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनिय कामकाजाबाबत माहिती देत त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. राजर्षी शाहू सहकारी बँक नेहमीच तळागाळातील आर्थिक दुर्बल घटकांना वेगवेगळ्या योजनांतर्गत आर्थिक स्वरुपात मदत करत असते, तसेच सामाजिक कार्याबाबत नेहमीच अग्रेसर असते, असे सांगितले.
या कार्यक्रमास बँकेच्या उपाध्यक्षा सौ. कमल व्यवहारे, श्री. पद्माकर पवार, श्रीमती मंगला जाधव, श्रीमती कुसुम अडसुळे, श्री. अभय मोहिते, श्री. सतीश नाईक, श्रीमती श्यामकौर शिंदे, श्री.लक्ष्मण जाधव, श्रीमती आनंदी कुलकर्णी, श्री. सुबीर कोतवाल, श्री. मनन शिंदे, कार्यलक्षी संचालक श्री. सुनिल देसाई, श्री. प्रमोद जाधव व मा.व्यवस्थापन मंडळाचे श्री. किशोर कापसे, श्री. दिगंबर कांगो तसेच बँकेच्या शाखांचे शाखाधिकारी व सेवक वृंद आवर्जुन उपस्थित होते.