हनुमान पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना संस्थापक अध्यक्ष बळवंत पाटील आणि इतर मान्यवर  
Co-op Credit Societies

श्री हनुमान सहकारी पतसंस्था कोतोलीची वार्षिक सभा उत्साहात

सभासदांना १५% लाभांशाची परंपरा यंदाही कायम

Pratap Patil

कोतोली येथील श्री हनुमान सहकारी ग्रामीण नागरी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थापक अध्यक्ष बळवंत पाटील यांनी तीस वर्षांपूर्वी संस्थेची स्थापना केली असून स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग 'अ' मिळवलेला आहे. संस्थेस चालू आर्थिक वर्षात १ कोटी ४६ लाख नफा झाला असून शंभर कोटींच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केलेला आहे. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. बळवंत पाटील म्हणाले, 'संस्थेच्या मुख्य शाखेसह सहा शाखा आहेत. कर्जदाराला पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले आहे. पतसंस्थेने सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची आपली परंपरा यंदाही कायम ठेवलेली आहे."

अहवालवाचन मुख्य व्यवस्थापक भीमराव फिरिंगे यांनी केले. यावेळी हनुमान पतसंस्था, दूध संस्था, भैरव विकास सेवा संस्थेत उत्कृष्ट योगदान देणारे सभासद तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. कार्यक्रमाला उपाध्यक्ष तानाजी पाटील, दूध संस्थेचे अध्यक्ष मानसिंग पाटील, माजी जि. प. सदस्य शंकर पाटील, प्रशांत पाटील, सागर वरपे, राजेंद्र गंधवाले, रणजित चौगुले, महादेव पाटील, राम सावंत, प्रकाश पाटील, प्रकाश पोवार, विष्णू रेडेकर, विनायक माने, सतीश सर्वगोडे, प्रकाश कुंभार, कृष्णात पाटील, कर्मचारी वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT