क्रेडिट कार्ड बंद केल्यास तुमची एकूण उपलब्ध क्रेडिट मर्यादा कमी होते. त्यामुळे पूर्वीइतकाच खर्च केला तरी उपलब्ध मर्यादेच्या तुलनेत क्रेडिट वापराचे प्रमाण (Credit Utilisation Ratio) वाढू शकते. जास्त क्रेडिट वापराचा परिणाम क्रेडिट प्रोफाइलवर होण्याची शक्यता असते.
सर्वात जुने क्रेडिट कार्ड कमी वापरात असले तरी ते तुमच्या दीर्घकालीन क्रेडिट इतिहासाचा महत्त्वाचा भाग असते. क्रेडिट ब्युरो कर्जपात्रतेचे मूल्यांकन करताना खात्यांचा कालावधीही विचारात घेतात. त्यामुळे जुने खाते बंद केल्यास तुमच्या क्रेडिट इतिहासावर परिणाम होऊ शकतो.
जर एखाद्या कार्डावर जास्त वार्षिक शुल्क आकारले जात असेल, त्यातून विशेष लाभ मिळत नसतील किंवा ते अनावश्यक खर्चाला प्रोत्साहन देत असेल, तर ते बंद करणे योग्य ठरू शकते. विशेषतः ज्यांचे क्रेडिट प्रोफाइल मजबूत आहे आणि अनेक सक्रिय क्रेडिट खाती आहेत, त्यांच्यावर त्याचा परिणाम तुलनेने कमी होऊ शकतो.
क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती करण्यापूर्वी खालील बाबींची खात्री करून घ्या.
सर्व थकबाकी पूर्णपणे भरली आहे.
प्रलंबित व्यवहार पूर्ण झाले आहेत.
उपलब्ध रिवॉर्ड पॉइंट्स किंवा कॅशबॅकचा वापर केला आहे.
कार्डशी जोडलेली सर्व Recurring Payments इतर कार्ड किंवा खात्यावर हलवली आहेत.
कार्ड बंद झाल्यानंतर क्रेडिट रिपोर्टमध्ये खाते योग्यरित्या "Closed" म्हणून नोंद झाले आहे, याची पडताळणी करा.
तज्ज्ञांच्या मते, केवळ एक कार्ड बंद केल्यानेच क्रेडिट स्कोअर ठरत नाही. वेळेवर कर्ज व कार्ड बिलांचे पेमेंट, मर्यादित कर्जाचा वापर आणि जबाबदारीने आर्थिक व्यवहार करणे हे चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी अधिक महत्त्वाचे असते.
निष्कर्ष:- न वापरलेले क्रेडिट कार्ड बंद केल्याने क्रेडिट स्कोअरला प्रत्येक वेळी फटका बसतोच असे नाही. मात्र, हा निर्णय घाईने घेऊ नये. क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी त्याचा उपलब्ध क्रेडिट मर्यादा, क्रेडिट इतिहास आणि भविष्यातील कर्ज योजनांवर होणारा परिणाम विचारात घेणे आवश्यक आहे. काही मिनिटांचा विचार आणि योग्य नियोजन तुमचे मजबूत क्रेडिट प्रोफाइल सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकते.