सिंधुदुर्ग DCC बँकेत ६७ लिपीक पदांची भरती; 'TCS' घेणार संगणकीय परीक्षा 
Co-op Banks

सिंधुदुर्ग DCC बँक: ६७ लिपीक पदांसाठी भरती जाहीर

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मार्फत संगणकीय परीक्षा; अर्जाची मुदत, परीक्षेची तारीख आणि अधिकृत वेबसाईटबाबत सविस्तर माहिती एका क्लिकवर

Prachi Tadakhe

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या आस्थापनेवरील मंजूर ६७ लिपीक (Clerk) पदांसाठी सरळसेवा पद्धतीने नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. देशातील नामांकित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या संस्थेमार्फत ही परीक्षा संगणक आधारित (Online) पद्धतीने घेतली जाणार असून पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

यापूर्वी बँकेने आयबीपीएस (IBPS) मार्फत भरती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले आहेत. बँकेचा वाढता व्यवसाय आणि शाखांमधील कार्यक्षमता वाढवण्यासाठी आता ६७ जागांसाठी टीसीएस संस्थेशी करार करण्यात आला आहे.

भरती प्रक्रियेचे वेळापत्रक:

  • ऑनलाईन अर्ज सुरुवात: ३ सप्टेंबर २०२६ (दुपारी १२:०० वाजेपासून)

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: १७ सप्टेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)

  • परीक्षा व प्रवेशपत्र दिनांक: बँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाईल

बँक खात्याची माहिती (परीक्षा शुल्कासाठी):

  • Entity Name: The Sindhudurg District Central Co-Operative Bank Limited

  • Beneficiary Account Name: SINDHUDURG DCC BANK EXAM FEE

  • Bank A/c Number: 999410040000001

  • NEFT IFSC Code: SIDC0001999

  • Branch: Head Office - Sindhudurgnagari

महत्त्वाच्या अटी व नियम:

  • परीक्षा शुल्क प्रक्रिया: NEFT/IMPS/Account Transfer किंवा बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन भरता येईल. अर्जात भरलेल्या ट्रान्सझॅक्शनचा फोटो किंवा स्क्रीनशॉट अपलोड करणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-Refundable) असेल.

  • अधिवास दाखला: अर्ज भरताना महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे अनिवार्य आहे.

  • अचूक माहिती: ऑनलाईन अर्ज भरताना शैक्षणिक पात्रता, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूक भरावा, कारण नंतर दुरुस्ती करता येणार नाही.

  • हेल्पलाईन: अर्ज भरताना अडचणी आल्यास TCS हेल्पलाइन नंबर ७९६९१०४१११ वर संपर्क साधावा.

अधिकृत माहिती व अर्जासाठी बँकेच्या www.sindhudurgdcc.bank.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

SCROLL FOR NEXT