भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चेक ट्रंकेशन सिस्टीम (CTS) अंतर्गत ३ ऑक्टोबर २०२५ रोजी विशेष क्लिअरिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ ऑक्टोबरपासून सातत्यपूर्ण (Continuous) क्लिअरिंग व सेटलमेंट प्रणाली लागू होणार असल्यामुळे हा विशेष क्लिअरिंग सत्र ठेवण्यात येणार आहे.
आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ३ ऑक्टोबर रोजीचे सत्र पुढीलप्रमाणे असतील :
रिटर्न सत्र (१ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या प्रेझेंटेशनसाठी) : सकाळी ८.०० ते १०.००
विशेष प्रेझेंटेशन सत्र : सकाळी ११.०० ते दुपारी ३.००
विशेष रिटर्न सत्र : सायं. ५.०० ते रात्री ८.००
या दिवशी नियमित क्लिअरिंग सत्र होणार नसून सर्व प्रकारचे चेक व इतर साधनं फक्त विशेष क्लिअरिंगमध्ये स्वीकारले जातील. बँकांना या सत्रांसाठी “Clearing Type 99” व “Session No. 21 (Presentation) / 22 (Return)” वापरणे आवश्यक असेल.
तसेच, सेटलमेंटची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी बँकांनी आपल्या सेटलमेंट खात्यांमध्ये पुरेसा निधी ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
आरबीआयने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स अॅक्ट 2007 अंतर्गत घेतला असून, सर्व सदस्य बँकांनी व त्यांच्या उप-सदस्यांनी हे निर्देश काटेकोरपणे पाळणे अपेक्षित आहे