२००० रुपयांच्या नोटा अजूनही बाजारात 
Co-op Banks

२००० रुपयांच्या नोटा अजूनही बाजारात दिसतात का?

आरबीआयचा मोठा खुलासा

Prachi Tadakhe

२००० रुपयांच्या जांभळ्या नोटा अजूनही बाजारात दिसतात का? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, अजूनही तब्बल ₹५,८१७ कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा चलनात आहेत.

१९ मे २०२३ रोजी आरबीआयने या उच्च मूल्याच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती, मात्र त्या आजही कायदेशीर चलन आहेत. म्हणजेच, तुमच्याकडे २००० रुपयांची नोट असेल तर ती अजूनही वैध आहे आणि तुम्ही ती आरबीआयच्या जारी कार्यालयांमध्ये किंवा पोस्ट ऑफिसद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता.

घोषणेच्या दिवशी चलनात असलेल्या २००० रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य होते ₹३.५६ लाख कोटी, परंतु आता ते फक्त ₹५,८१७ कोटींवर आले आहे. म्हणजेच, ९८.३७% नोटा परत जमा झाल्या आहेत.

आरबीआयने सांगितले की, देशभरातील १९ जारी कार्यालयांमध्ये अजूनही नोटा जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अहमदाबादपासून ते तिरुवनंतपुरमपर्यंत या केंद्रांमध्ये जनता आपली नोट सुरक्षितपणे बँक खात्यात जमा करू शकते.

SCROLL FOR NEXT