गुजरातस्थित प्राइम को ऑपरेटिव्ह बँकेने त्यांच्या दांडिया बाजार (बडोदा) आणि कर्जन शाखा नुकत्याच नवीन, विकसित परिसरात यशस्वीरित्या स्थलांतरित केल्या आहेत. यावेळी प्राइम को ऑपरेटिव्ह बँकेचे सीईओ आदिल गांधी म्हणाले की, "ग्राहकांना सुखद अनुभव, सुलभ सुविधा देण्यासाठी व ग्राहकांना अखंड बँकिंग अनुभव मिळावा यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, प्राइम कोऑपरेटिव्ह बँक आता सुधारित शाखा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुधारित सुविधा देण्यासाठी तत्पर असतील. आमच्या कर्जन येथील शाखेने लॉकर सुविधा सुरू केल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांच्या मौल्यवान वस्तूंसाठी वाढीव सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध आहेत."
प्राइम को ऑपरेटिव्ह बँकेचे सीईओ आदिल गांधी यांनी सतत वाढ आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आणि सांगितले की, "हे अपग्रेड बँकेच्या कामकाजाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहेत. या दोन शाखांचे स्थलांतर आणि नवीन सुविधांसह, प्राइम कोऑपरेटिव्ह बँक गुजरातमध्ये आपली उपस्थिती मजबूत करत आहे."