ग्रामीण बँकांमध्ये (RRBs) भरती प्रक्रिया सुरू 
Co-op Banks

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRBs) भरती प्रक्रिया सुरू

अधिकारी व कार्यालयीन सहायक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Prachi Tadakhe

मुंबई: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील (RRBs) गट "अ" (अधिकारी स्केल-I, II आणि III) आणि गट "ब" (कार्यालयीन सहायक - मल्टिपर्पज) या रिक्त पदांच्या भरतीसाठी सामायिक भरती प्रक्रिया (CRP RRBs XV) जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक:

  • ऑनलाइन नोंदणी व अर्ज शुल्क भरण्याची मुदत: ०१.०९.२०२६ ते २१.०९.२०२६

  • अर्जातील बदल/दुरुस्तीसाठी एडिट विंडो: नोंदणी बंद झाल्यानंतर (अधिकृत संकेतस्थळावर सूचित केले जाईल)

  • पूर्वपरीक्षा प्रशिक्षण (PET) आयोजन: नोव्हेंबर, २०२६

  • ऑनलाइन परीक्षा (पूर्वपरीक्षा): नोव्हेंबर / डिसेंबर, २०२६

  • पूर्वपरीक्षेचा निकाल: डिसेंबर, २०२६ / जानेवारी, २०२७

  • ऑनलाइन परीक्षा (मुख्य/सिंगल): डिसेंबर, २०२६ / जानेवारी, २०२७

भरती प्रक्रियेची थोडक्यात माहिती:

  • संस्था: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)

  • पदांची नावे: अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि कार्यालयीन सहायक (मल्टिपर्पज).

  • मुलाखत प्रक्रिया: गट "अ" - अधिकारी (स्केल-I, II आणि III) पदांच्या मुलाखती योग्य प्राधिकाऱ्याच्या सल्ल्याने आणि नाबार्ड व आयबीपीएस यांच्या मदतीने नोडल प्रादेशिक बँक समन्वित करून, जानेवारी/फेब्रुवारी २०२७ मध्ये होणे अपेक्षित आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी आयबीपीएसच्या अधिकृत www.ibps.in या संकेतस्थळावर दिलेली सविस्तर अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

  2. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर अटींची पूर्तता होत असल्याची खात्री करूनच अर्ज करावा.

  3. कोणत्याही प्रकारच्या चौकशी किंवा तक्रारीसाठी उमेदवारांनी https://cgrs.ibps.in या पोर्टलवर लॉग इन करावे, असे आवाहन संचालक, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT