जि.मध्य.सह.बँकेचे लिपिक सुरेंद्र पाटील यांनी सापडलेले सोन्याचे पाच तोळ्यांचे ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत केले.याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.शेजारी प्रताप माने,जी.एम.शिंदे. 
Co-op Banks

जिल्हा बँकेच्या प्रामाणिक कर्मचाऱ्याचा मंत्री मुश्रीफ यांच्याकडून गौरव

सापडलेले ५ तोळे सोन्याचे ब्रेसलेट लिपिक सुरेंद्र पाटलांनी केले परत

Pratap Patil

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे लिपिक सुरेंद्र पाटील यांनी त्यांना दुचाकी पार्किंगमध्ये सापडलेले पाच तोळे सोन्याचे ब्रेसलेट ज्याचे त्याला परत केले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा नुकताच जिल्हा बँकेत वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि बँकेचे अध्यक्ष ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. "प्रामाणिकपणा हाच माणसाचा खरा मौल्यवान दागिना आहे, आणि हे आपल्या बँकेच्या कर्मचाऱ्याने त्याच्या नेक कृतीतून दाखवून दिलेले आहे." अशा शब्दांत ना. मुश्रीफ यांनी त्यांचे कौतुक केले.

सुरेंद्र पाटील (मौजे सांगाव, ता. कागल) हे बँकेच्या प्रधान कार्यालयात शेती कर्ज विभागात कार्यरत आहेत. दोनच दिवसांपूर्वी बँकेच्या नव्या इमारतीमागील पार्किंगमध्ये मोटारसायकल बाहेर काढताना त्यांना पाच तोळे सोन्याचे ब्रेसलेट सापडले होते. त्यांनी अनेकांना याबाबतची माहिती दिली. मात्र, ते नेमके कोणाचे हे समजत नव्हते.

त्यांनी आपल्या मोटारसायकलच्या शेजारीच मोटारसायकल लावलेल्या बँक कर्मचारी विकास पाटील (रा. कसबा बावडा) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आपल्या हातातील ब्रेसलेट हरवल्याचे सुरेंद्र पाटील यांना सांगितले. सुरेंद्र पाटील यांनी विकास पाटील यांना प्रधान कार्यालय परिसरात बोलावून त्यांचे सोन्याचे ब्रेसलेट सुपूर्त केले.

SCROLL FOR NEXT