श्री गजानन नागरी सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. शेख मंजूर अहमद शेख सलीम व उपस्थित मान्यवर  
Co-op Banks

डॉ.शेख यांना 'भारतरत्न सहकारिता पुरस्कार" प्रदान

सहकारी बँकिंगमधील योगदानाचा केंद्र सरकारकडून गौरव

Pratap Patil

बीड येथील श्री गजानन नागरी सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. शेख मंजूर अहमद शेख सलीम यांना महाराष्ट्र राज्यातील नागरी सहकारी बँकांमधून निवडण्यात येणारा 'भारतरत्न सहकारिता पुरस्कार" नुकताच प्रदान करण्यात आला. दि ललित हॉटेल, मुंबई येथे आयोजित सोहळ्यात श्री. सुमनेश जोशी जॉईंट सेक्रेटरी मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन भारत सरकार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला बँकेचे सीईओ श्री. एम. आर. क्षीरसागर उपस्थित होते.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष श्री. जयदत्त सोनाजीराव क्षीरसागर उर्फ अण्णा, उपाध्यक्ष श्री. जगदीश वासुदेवराव काळे उर्फ भाऊ व संचालक मंडळ यांनी डॉ. शेख यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. शेख यांना यापूर्वी सन २०२५ या वर्षाचा" बेस्ट सीईओ /सरव्यवस्थापक ॲवॉर्ड" प्रदान करण्यात आलेला आहे.

डॉ. शेख मंजूर अहमद यांना यापूर्वीही महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन लिमिटेड., मुंबई यांच्याकडून पीएचडी ॲवॉर्ड, बेस्ट मॅनेजर ॲवॉर्ड आणि दोन वेळा बेस्ट सीईओ ॲवॉर्ड असे चार पुरस्कार मिळालेले आहेत.

SCROLL FOR NEXT