डिजिटल क्रांतीनंतर भारतीय बँकिंग क्षेत्र आता त्याच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, UPI आणि डिजिटल पेमेंट्सनंतर आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बँकिंग सेवांना नव्या उंचीवर नेत आहे. मात्र AI तंत्रज्ञानाचा जबाबदार आणि नैतिक वापर" केल्यासच बँकिंगचे हे नवे युग यशस्वी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियंत्रित संस्थांसाठी (सहकारी बँकाही समाविष्ट ) खासकरून डिझाईन केलेले "FREE-AI (Framework for Regulated Entities on Ethical AI)" हा नवा मार्गदर्शक आराखडा नुकताच जाहीर केलेला आहे.
AI मुळे ग्राहक सेवा वेगवान होत असून, कर्ज प्रक्रिया अधिक अचूक, तसेच फसवणूक झाल्यास ती तत्काळ शोधणे शक्य होत आहे. मात्र, यासोबतच डेटा गोपनीयता, सायबरसुरक्षा आणि अल्गोरिदमिक पक्षपातीपणा यांसारखी आव्हानेही या तंत्रज्ञानासमोर येतात.
RBI चा "FREE-AI फ्रेमवर्क"
यामध्ये "सात प्रमुख सूत्रे" अधोरेखित केलेली आहेत :
* विश्वास हा पाया
* माणूस प्रथम
* नवकल्पना रोखू नये
* न्याय व समानता
* उत्तरदायित्व
* समजण्याजोगी रचना
* सुरक्षा व टिकाऊपणा
तसेच पुढीलप्रमाणे "सहा धोरणात्मक स्तंभ" दिलेले आहेत – AI Innovation Sandbox, स्पष्ट संस्थात्मक धोरण, कर्मचारी प्रशिक्षण, उच्च-जोखीम AI साठी मंजुरी प्रक्रिया, ग्राहक संरक्षण, आणि स्वतंत्र लेखापरीक्षण.
बँकिंगमधील नवे बदल :
FREE-AI फ्रेमवर्कमुळे बँकिंग क्षेत्रात मोठे बदल घडू शकतात –
✅ स्थानिक भाषांमध्ये २४x७ ग्राहक सेवा
✅ Thin-file ग्राहकांसाठी पर्यायी डेटा वापरून कर्ज सुविधा
✅ फसवणूक शोध क्षणार्धात घेता येणार
✅ व्यवहाराच्या पॅटर्ननुसार वैयक्तिकृत योजना
या उपक्रमामुळे विशेषतः ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील "आर्थिक समावेशनावर" सकारात्मक परिणाम होईल.
‘विश्वासाचा चार्टर’:
RBI च्या FREE-AI ची योग्य अंमलबजावणी झाल्यास, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्था यांना डिजिटल युगात स्पर्धात्मक बळकटी मिळेल, ग्राहकांचा विश्वास वाढवण्याची आणि कार्यक्षमता सुधारण्याची नवी संधी मिळेल. त्यामुळे RBI चा FREE-AI हा केवळ तांत्रिक दस्तऐवज नाही, तर बँकिंग क्षेत्रासाठी एक "विश्वासाचा चार्टर"आहे.
👉 तज्ज्ञांचे मत आहे की, "AI चा जबाबदार आणि नैतिक वापर" केल्यासच बँकिंगचे हे नवे युग दीर्घकालीन यशस्वी ठरेल – आणि RBI चा FREE-AI फ्रेमवर्क त्यासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरेल.