अहमदनगर मर्चंट्स सहकारी बँकेत भरती 
Co-op Banks

अहमदनगर मर्चंट्स सहकारी बँकेत भरती

ऑडिट व कॉम्प्लायन्स विभागासाठी ‘ज्युनिअर ऑफिसर’ पदांसाठी अर्ज मागवले

Vijay chavan

अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. (शेड्युल्ड बँक) या अग्रगण्य सहकारी बँकेने मुख्यालयासाठी ‘ज्युनिअर ऑफिसर’ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँकेच्या ऑडिट विभाग आणि कॉम्प्लायन्स विभागात एकूण ७ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

बँकेच्या अधिकृत माहितीनुसार, ऑडिट विभागासाठी ४ पदे, तर कॉम्प्लायन्स विभागासाठी ३ पदे उपलब्ध आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार सीए (चार्टर्ड अकाउंटन्सी) अभ्यासक्रम शिकत असणे आणि CA Intermediate/IPCC परीक्षा Group I किंवा Group II उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. बँकिंग नियम, ऑडिटिंग स्टँडर्ड्सचे ज्ञान, विश्लेषणात्मक क्षमता आणि बारकाव्यांकडे लक्ष देण्याची सवय असलेले उमेदवार प्राधान्याने विचारात घेतले जातील.

अर्जासाठी उमेदवारांनी सविस्तर बायोडाटा, दोन पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रत (attested copies) पाठवणे आवश्यक आहे. अर्ज पोस्ट, कुरिअर, प्रत्यक्ष हाताने किंवा ई-मेलद्वारे पाठवता येतील. ई-मेल अर्जासाठी अधिकृत पत्ता:
recruitment@amcbank.in

ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत अर्ज पोहोचणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणारे वेतन हे पात्रता व अनुभवाच्या आधारे निश्चित केले जाणार असल्याचे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बँकेचे मुख्य कार्यालय मार्केट यार्ड, स्टेशन रोड, अहिल्यानगर (प्लॉट नं. ३३) येथे असून, ही भरती बँकेच्या विस्तार योजनांचा भाग असल्याचेही सांगण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया युवा सीए विद्यार्थ्यांसाठी आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी मानली जात आहे.

SCROLL FOR NEXT