इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होताना व उपस्थित बँकेचे मान्यवर पदाधिकारी 
Co-op Banks

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते ‘अभिनंदन हाइट्स’चे लोकार्पण

अभिनंदन अर्बन को-ऑप. बँकेच्या नव्या यशस्वी पर्वाची दमदार सुरुवात

VIJAY CHAVAN

अमरावतीतील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य वित्तीय संस्था अभिनंदन अर्बन को-ऑप. बँकेच्या स्वमालकीच्या अत्याधुनिक ‘अभिनंदन हाइट्स’ इमारतीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात बँकेच्या मुख्य कार्यालयात फिट कापून व भगवान अभिनंदन स्वामींच्या प्रतिमेला मालार्पण करून करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण इमारतीची पाहणी करून बँकेच्या आधुनिक सुविधा आणि बांधकाम गुणवत्तेचे मनापासून कौतुक केले.

लोकार्पण सोहळ्याची भव्य पार्श्वभूमी

मुख्य लोकार्पण समारंभ श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

या वेळी मंचावर मा. डॉ. पंकजी भोयर, राज्यमंत्री (सहकार व गृहविभाग), मा. सौ. सुलभाताई खोडके, आमदार अमरावती मतदारसंघ, मा. श्री. रविजी राणा, आमदार बडनेरा मतदारसंघ आणि मा. श्री. शांतीलालजी मुथ्था, संस्थापक, भारतीय जैन संघटना आदी मान्यवर उपस्थित होते.

बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय बोथरा, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग, संचालक नविन चोरडिया, व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी देठे यांनी मुख्यमंत्री यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशंसोद्गार

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या भाषणात अभिनंदन बँकेच्या प्रगतीचा गौरव करत सांगितले –

“अभिनंदन बँकेची ‘अभिनंदन हाइट्स’ इमारत ही कोणत्याही कॉर्पोरेट बँकेलाही लाजवेल अशी आहे. इमारतीचे बांधकाम दर्जेदार, अत्याधुनिक आणि बँकेच्या प्रगतीचे प्रतीक आहे. अ‍ॅड. विजय बोथरा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन. सहकार क्षेत्रात गुणवत्ता व पारदर्शकतेचा उत्तम नमुना म्हणजे अभिनंदन बँक.”

त्यांनी पुढे सांगितले की, “२१ वर्षांपासून सातत्याने अध्यक्षपदावर राहून अ‍ॅड.बोथरा यांनी जे संघटन कौशल्य दाखवले आहे, ते अनुकरणीय आहे. बँकेच्या प्रामाणिक कारभारामुळे नागरिकांचा विश्वास या संस्थेवर अबाधित आहे. सुरक्षित ठेवी ठेवायच्या असतील तर अभिनंदन बँक ही सर्वोत्तम निवड आहे.”

अभिनंदन हाइट्स

अभिनंदन बँकेची प्रगती झलक (३१ मार्च २०२५ पर्यंत):

  • एकूण व्यवसाय: ₹६२७.७४ कोटी

  • ठेवी: ₹३७३.७७ कोटी

  • कर्जे: ₹२५३.९७ कोटी

  • नफा: ₹५.६९ कोटी

  • सी.डी. रेशो: ६८%

  • सी.आर.ए.आर.: १९.४९%

  • ग्रॉस एनपीए: ०.१४%

  • नेट एनपीए: ०%

भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार बँक सतत FSWM (Financially Sound and Well Managed) या श्रेणीत राहिली आहे. बँकेला ‘सहकार निष्ठ’ आणि ‘सहकार भूषण’ असे दोन्ही प्रतिष्ठित राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

अ‍ॅड. विजय बोथरा यांचे मनोगत

बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय बोथरा म्हणाले,

“१९९८ मध्ये ‘सेवा, संचय, प्रगती’ या ब्रीदवाक्याने बँकेने प्रवास सुरू केला. आज ‘अभिनंदन हाइट्स’च्या रूपाने आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आमचे ध्येय नेहमीच ‘सन्मानाने बँकींग’ राहिले आहे — ग्राहकसेवा, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी हाच आमचा मार्ग.”

त्यांनी पुढे सांगितले की, “अभिनंदन हाइट्स ही केवळ इमारत नसून, ती अभिनंदन परिवाराच्या परिश्रम, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. यामुळे बँकेच्या व्यवसायवृद्धीस नवी संजीवनी मिळेल.”

उपस्थिती व आयोजन

या सोहळ्यास संचालक मंडळ, विविध संस्थांचे मान्यवर, सभासद व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्य कार्यालय आणि सर्व शाखांतील कर्मचारीवर्गाने अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

SCROLL FOR NEXT