पुणे जिल्हा सहकारी बँकेची पूरग्रस्तांसाठी १.२६ कोटींची मदत!

"मानवतावादी उपक्रमांना मदतीसाठी बँक सातत्याने पुढे येते!"
पुणे जिल्हा सहकारी बँक
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करताना उपस्थित मान्यवर
Published on

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येत महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीला १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

पुणे जिल्हा सहकारी बँक
पुणे जिल्हा सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन उत्साहात

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मानवतावादी उपक्रमांना मदत करण्यासाठी बँकेने सातत्याने पुढे येत राहून काम केले आहे, अशा शब्दांत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गौरव केला. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक मंडळाचे सदस्य आणि वरिष्ठ बँक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Banco News
www.banco.news