अहमदनगर लॉयर्स सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड लक्ष्मण कचरे यांची निवड

गुप्त मतदानातून ॲड लक्ष्मण कचरे यांची अध्यक्षपदी निवड
नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.लक्ष्मण कचरे
अहमदनगर लॉयर्स को ऑप सोसायटी अध्यक्षपदी ॲड लक्ष्मण कचरे यांची निवड अहमदनगर लॉयर्स को ऑप सोसायटी
Published on

अहमदनगर लॉयर्स को ऑप सोसायटीची स्थापना ४० वर्षांपूर्वी झाली. या संस्थेचे कामकाज सहकारी तत्वावर चालते. सदर संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. सहकार उपनिबंधक कार्यालयातील श्री.आव्हाड यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले. यावेळी चेअरमन पदासाठी ॲड लक्ष्मण कचरे यांचा आणि ॲड रावसाहेब बर्डे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या पदासाठी गुप्त मतदान घेण्यात आले. त्यामध्ये कचरे यांना १२ मते मिळाली तर बर्डे यांना २ मते मिळाली.  यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कचरे यांची चेअरमनपदी निवड झाल्याचे जाहीर केले.

याप्रसंगी संस्थेचे माजी चेअरमन ॲड भूषण बर्हाटे, माजी चेअरमन ॲड रवींद्र शितोळे उपस्थित होते.हि निवडणूक संस्थेच्या संचालक मंडळामध्ये ठरल्यानुसार दोन वर्ष पूर्ण झाल्यानुसार पार पडली. या सोसायटीत वकील आणि पक्षकार यांच्यासाठी टाचणीपासून स्टँप, कोर्ट फी, कोर्ट कामासाठी आवश्यक खरेदी व्यवहार केले जातात. वकिलांसाठी असणाऱ्या या पतसंस्थेत जिल्हा न्यायालयातील सर्व वकील प्रामुख्याने समाविष्ट आहेत.     

Banco News
www.banco.news