तुळजाई पतसंस्थेतर्फे २८ व्या वर्धापन दिनानिमित्त १०वी १२वी गुणवंतांचा सत्कार

सभासदांच्या मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप
www.banco.news
तुळजाई पतसंस्थेतर्फे १०वी १२वी गुणवंतांचा सत्कार तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था, तुळजापूर खुर्द, तुळजापूर
Published on

तुळजापूर खुर्द येथील तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त व आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. जीवनराव पवार यांनी मार्गदर्शन केले. तुळजाई पतसंस्था मागील २८ वर्षांपासून सातत्याने करीत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून ते म्हणाले की, प्रत्येक शहरवासीयांनी आपल्या शहरांमधील शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष दिल्यास आपल्या शहरांमधून इतर शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाण्याची आपल्याला गरज नाही. आपल्या तुळजापूर शहरांमधील शाळा महाविद्यालयामधून शिक्षण घेणारे विद्यार्थी विविध ठिकाणी कार्यरत असून आपल्या शहरांमध्ये ही दर्जेदार शिक्षण उपलब्ध असल्याचे नमूद करून आत्मविश्वासाने व जिद्दीने अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना निश्चित यश मिळतेच याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून धनगर समाजातील मेंढपाळ करत अभ्यास करून आयपीएस झालेले मा. बिरूदेव ढोणे यांचे आदर्श घेऊन अभ्यास करावा.

यावेळी इयत्ता दहावी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह बॅग, पुष्पगुच्छ देऊन पालकांसमवेत सन्मान करण्यात आला. यावेळी तुळजापूर खुर्द येथील नगर परिषद शाळा क्र ३ मधील इयत्ता ३ री व ४थी च्या संपूर्ण वर्गासाठी स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन श्री राजाभाऊ देशमाने नगरसेवक तथा संचालक श्री पंडितराव जगदाळे तुळजाई मंडळाचे अध्यक्ष श्री आदिनाथ ठेले संचालक श्री अमीर शेख श्री संजय देशमाने श्री मकसूद शेख संचालिका सौ लक्ष्मी एकदंते नगर परिषद शाळा क्र.३ मुख्याध्यापक श्री मोटे सर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व्हा. चेअरमन श्री ताटे सर यांनी केले. आभार, संचालक श्री संजय देशमाने यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सर्व संचालक,कर्मचारी,संक्षेप ठेव प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.

Banco News
www.banco.news