
नाशिक जिल्ह्यातील एस एस के धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था नायगाव, नाशिक.सातत्यानं सभासद हित, कर्जवाटप, ठेवी या पथाने मार्गक्रमण करत आहे. संस्था कार्यक्षमतेने वाटचाल करत आहे. नुकतीच संस्थेची १४ वी नवीन शाखा विंचूर येथे सुरु झाली त्याचा लोकार्पण सोहळा कुसुम कातकडे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन संग्राम कातकडे उपस्थित होते. त्यांनी संस्थेला विभागीय कार्यक्षेत्रास परवानगी मिळाल्याची माहिती दिली. यावेळी चंद्रकांत सांगळे यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी त्यांनी संस्थेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. एस एस के धनलक्ष्मी पतसंस्था, नायगाव ही आपल्या स्थानिक समुदायाच्या गरजांनुसार आर्थिक सेवा पुरवणारी एक विश्वासार्ह सहकारी संस्था आहे.बचत, कर्ज व गुंतवणूक यासाठी विविध उपाययोजना उपलब्ध करून देते आणि विकास, सुरक्षितता व ग्राहक समाधान या मूल्यांप्रती कटिबद्ध आहे.
एस एस के धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ही संस्था QR कोड व तात्काळ पेमेंट सेवा, SMS बँकिंग, ठेवी (दैनिक ठेवी व धनसंय जमा यासह) आणि वैयक्तिक कर्ज अशा सेवा पुरवते.संस्था सहकारी चळवळीशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सहभागी असते आणि आपल्या सभासदांसह कर्मचारी, संचालक व ग्राहकांसोबत सण व कार्यक्रम साजरे करत असते.