श्री समर्थ पतसंस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष वृक्षारोपण उपक्रमाने साजरे

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षप्रजातींचे रोपण करण्यात आले.
www.banconews.com
श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था रौप्य महोत्सवी वर्षनिमित्त वृक्षारोपण श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था
Published on

श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था ,चिंबळी फाटा ( कुरुळी) ता.खेड ,जि.पुणे यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, संस्थेच्या सामाजिक बांधिलकीतून आणि पर्यावरण पुरक वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी गोलेगाव आणि पिंपळगाव येथील गायरान व शाळेच्या परिसरात करण्यात आले.

या कार्यक्रमात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वड, पिंपळ, कडुलिंब, बेल, शिसम, उंबर अशा विविध वृक्षप्रजातींचे रोपण करण्यात आले. संस्थेचे संस्थापक/आधारस्तंभ मा.श्री.संभाजीशेठ गवारे, संस्थापक/अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गवारे, खजिनदार मा. संचालक श्री. संतोषशेठ गवारे, उमेशशेठ येळवंडे, बाळासाहेब येळवंडे, दत्तात्रय नाणेकर, अनिलशेठ कड, विठ्ठल दादा ठाकुर, सुनिल लोखंडे, सतिश काकडे, तुषार पाचपुते, मुरलीधर चौधरी भानुदास गाडे, संभाजी घेनंद, ज्ञानेश्वर ठाकुर, सुनिल वर्पे,  अभिजित काळे, प्रशांत राणे, सीईओ अमोल गवारे तसेच इतर मान्यवर संचालक, सल्लागार, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.

गोलेगाव पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळा, त्यांचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी जागा उपलब्ध करुन देत व वृक्षारोपण कार्यक्रमास सहकार्य केले. यावेळी कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गवारे म्हणाले, "वृक्ष लावा, वृक्ष वाचवा हीच काळाची गरज आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात असा उपक्रम राबवण्याचा आम्हाला अभिमान वाटतो."या उपक्रमामुळे गावात हरित पट्टा निर्माण होण्यास मदत होईल, तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Banco News
www.banco.news