राधानगरी तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था राधानगरी, अध्यक्ष उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड

अध्यक्षपदी धनाजी महेकर यांची तर उपाध्यक्षपदी श्रीकांत चौगले यांची बिनविरोध निवड
www.banconews.com
राधानगरी तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था बिनविरोध राधानगरी तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था
Published on

राधानगरी तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक आदर्शवतरित्या बिनविरोध पार पडली. शाहू सभागृह, राधानगरी कोल्हापूर येथे पार पडलेल्या या निवडणुकीत व्यवस्थापक संतोष शिऊडकर यांनी माननीय अधिकारी, कर्मचारी व सभासदांचे स्वागत केले.संस्थापक बाबुराव शिरसाट यांनी प्रास्ताविक केले ज्यात उमेदवार नामनिर्देश केले व निवडणूक बिनविरोध होत असल्याचे जाहीर केले.

निवडणूक प्रक्रिया शांततेत व शिस्तबद्ध पार पडली. निवडणूक यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निबंधक अमित गराडे यांनी कामकाज निरीक्षण केले. अध्यक्ष पदी धनाजी महेकर यांची तर उपाध्यक्षपदी श्रीकांत चौगले यांची  बिनविरोध निवड झाली. या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष्य उपाध्यक्ष्य यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी सुकाणू समिती सदस्य विलास पाटील, आर. एस. पाटील, एन. डी  पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. समारोप मनोगत व्यक्त करत  एस.आर.पाटील यांनी आभार मानले.

Banco News
www.banco.news