कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड बिनविरोध

आयु. विकास नारायण कांबळे यांची अध्यक्षपदी तसेच उपाध्यक्षपदी आयु. सुजाता रविंद्र देसाई यांची निवड करणेत आली.
कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक पतसंस्था  निवड बिनविरोध
कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक पतसंस्था आयु. विकास नारायण कांबळे अध्यक्षपदी तसेच उपाध्यक्षपदी आयु. सुजाता रविंद्र देसाई
Published on

कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विकास कांबळे तर उपाध्यक्षपदी सुजाता देसाई यांची बिनविरोध निवड झाली.कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पदाधिकारी निवडीची सभा मंगळवार दिनांक १८/०७/२०२५ रोजी संस्था कार्यालयात पार पडली. या सभेमध्ये आयु. विकास नारायण कांबळे यांची अध्यक्षपदी तसेच उपाध्यक्षपदी आयु. सुजाता रविंद्र देसाई यांची निवड करणेत आली. या निवडीसाठी उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहरचे सहकारी अधिकारी मा.श्री.एन.ए.माने उपस्थित होते. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष दिलीप वायदंडे यांनी मा.एन.ए.माने साहेब यांच्यासह सर्व संचालकांचे स्वागत करून सभेच्या निवडीच्या कार्यक्रमाला सुरूवात करून दिली.मा.अधिकारी माने साहेब यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडीच्या घोषणेनंतर संस्थेचे तज्ज्ञ संचालक - मार्गदर्शक आयु. मा. रघुनाथ मांडरे सर यांनी नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा देताना पतसंस्थेच्या वाढ आणि विस्तारासंबंधी मौलिक मार्गदर्शन केले. पदाधिकारी यांनी संस्थेच्या उत्कर्षासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडीनंतर संस्था समिती सदस्य आयु. नंदकुमार कांबळे यांनी संस्था समिती सदस्य पदी आयु. सुजाता अशोक भास्कर यांच्या नावाची घोषणा केली. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संस्था समिती सदस्य यांचा सत्कार मा. श्री. एन. ए. माने यांच्या हस्ते करणेत आला. संस्थेचे ज्येष्ठ माजी संचालक आयु. प्रकाश पोवार यांनी या निवडी प्रसंगी सर्व नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष आयु. विकास कांबळे यांनी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्व ज्येष्ठ संचालक, कर्मचारी यांना धन्यवाद देवून संस्थेसाठी कायम वेळ देवून अधिकाअधिक उत्कर्षापर्यंत नेवून अध्यक्ष म्हणून केलेली निवड सार्थ करण्याचे आश्वासन दिले. सर्व संचालकांनी सहकार्य करून संस्थेच्या विस्तारासाठी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी संस्थेच्या नूतन उपाध्यक्षा आयु. सुजाता देसाई यांनी उपाध्यक्ष निवडीबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

Banco News
www.banco.news