
दि कराड अर्बन सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड यांची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि.२० जुलै२०२५ रोजी उत्साहात पार पडली.पंकज मल्टीपर्पज हॉल, शनिवार पेठ, कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभेला संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद, व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेसाठी विशेष उपस्थिती लाभली ती अर्बन कुटुंब प्रमुख मा. सुभाषराव जोशी, अर्बन बँकेचे मा. अध्यक्ष सुभाषराव एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मार्गदर्शक सीए दिलीप गुरव यांची.सभेच्या प्रारंभी सचिव श्री. किरण हणमंत मोटे यांनी प्रास्ताविक आणि सभेच्या नोटीसचे वाचन केले. त्यानंतर अध्यक्ष श्री. सलीम नुरंमहमद शेख यांनी संस्थेच्या आर्थिक वाटचालीचा सविस्तर आढावा सादर केला.
संस्थेची आर्थिक स्थिती (३१ मार्च २०२५ अखेर):
भागभांडवल: ₹ १ कोटी ९० लाख
ठेवी: ₹ ११७९.१६ लाख
कर्ज वाटप: ₹ १०१८.६९ लाख
गुंतवणूक: ₹ ८ कोटी १३ लाख
राखीव व इतर निधी: ₹ १ कोटी २० लाख
नफा (२०२४-२५): ₹ ४१.५२ लाख
ऑडीट वर्ग: "अ"
NPA: 0%
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अतुल शिंदे यांनी ११% लाभांश वितरणाचा ठराव सभेसमोर मांडून एकमुखाने मंजूर केला. नफा विनियोगाच्या माध्यमातून सभासदांना आकर्षक भेटवस्तू आणि आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अतुल शिंदे यांनी ११% लाभांश वितरणाचा ठराव सभेसमोर मांडून एकमुखाने मंजूर केला. नफा विनियोगाच्या माध्यमातून सभासदांना आकर्षक भेटवस्तू आणि आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गिरीश सिहासने, संदीप पवार, राजेंद्र कांबळे, प्रदीप कदम, प्रशांत दळवी, अमर भोकरे, किरण मोटे आणि व्यवस्थापिका सबिना इनामदारसभेच्या शेवटी उपाध्यक्ष श्री. अतुल शिंदे यांनी सर्व मान्यवर, सभासद व सेवक वर्गाचे मनःपूर्वक आभार मानले.संस्थेची प्रगती ही सभासदांचा विश्वास, सेवक वर्गाचे कष्ट व व्यवस्थापनाच्या दृढ नेतृत्वामुळे शक्य झाल्याचे सर्व उपस्थितांचे एकमत होते.