जय योगेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अक्राळे या संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवकृपा लॉन्स, रणतळे, दिंडोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. सभेचे अध्यक्ष श्री. गोरक्षनाथ मधुकर गायकवाड हे होते वार्षिक नफा तोटा व ताळेबंद मुख्य व्यवस्थापक श्री. तानाजी गोपीनाथ गायकवाड यांनी वाचन केले उर्वरित विषय संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक श्री. सोमनाथ नंदू गायकवाड व सहाय्यकव्यवस्थापक सौ. कीर्ती संदिप गायकवाड यांनी वाचन केले. सभासदांनी आपापल्या सुचना व्यासपीठावर मांडल्या. त्याला अनुसरून अध्यक्ष यांनी त्यांच्या सुचनांचे निराकरण केले.
संस्थेचे २०२६ चे व्हिजन तयार करून सभासदांपुढे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. नरेश भास्करराव देशमुख यांनी संस्थेचे कामकाज व दिशा देण्यासंबधीचे उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करावा याची माहिती दिली. संस्थेचे संचालक श्री. सुदाम बाबुराव ढाकणे यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व व्यवसाय वाढीसाठी संस्थेने विविध उपक्रम राबवावे असे सुचवले, संस्थेने दत्तक घेतलेल्या अंध मुलीला यानिमित्ताने मदत म्हणून पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच संस्थेचे माजी व्यवस्थापक तेही अपंग असल्याकारणाने एक मदतीचा हात म्हणून संस्थेने त्यांनाही रक्कम रुपये पाच हजाराचा धनादेश दिला. पुढील येणारे वर्ष रौप्य महोत्सव वर्ष म्हणून येत असल्याने त्यासाठी स्वतंत्र अशा कार्यक्रमाचे आयोजन करावे असे सभासद व संचालक यांनी सुचवले.