
असोंड येथे प्रधान कार्यालयात जनकल्याण पतसंस्थेची ३१ वी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.दशरथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, पतसंस्था सुरू करणे हे काम सोपे आहे मात्र सहकार क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर मात करत संस्थेला उभारी देणे हे कठीण काम आहे.सध्या सहकार क्षेत्रात शासनाच्या बदलत्या निकषानुसार आर्थिक धाडस करणे हे फार जिकरीचे झाले आहे परंतु असे असले तरी जनकल्याण ग्रामीण बिगरशेती पतसंस्था असोंड या पतसंस्थेकडून ग्राहकांची कदापि विश्वासार्हता गमविण्याचे वर्तन होणार नाही तर सदैव ग्राहकांची विश्वासार्हता वाढविण्याचेच काम होईल असे उदगार त्यांनी काढले
यावेळी बोलताना ते म्हणाले की,कर्जाचे व वसुलीचे योग्य पद्धतीने नियोजन केल्याने यावर्षी ६३ लाख ८३ हजार ९३१ रुपयांचा नफा पतसंस्थेला झाला आहे.पतसंस्थेचा चढता आलेख यापुढेही आपणा सर्वांच्या सहकार्याने आपल्याला पुढे न्यायचा आहे. असेही ते म्हणाले यावेळी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री गजानन पेठे यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल २२ वर्षे सहकार क्षेत्रात दिली.त्यांच्या या योगदानामुळेच आज जनकल्याण पतसंस्थेच्या शाखा विविध ठिकाणी सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत,त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत असे गौरव उदगार त्यांनी काढले.पतसंस्थेसाठी योगदान देत असलेले श्री.प्रकाश मांडके यांचेही काम वाखाणण्याजोगे असल्याचे श्री.पाटील यांनी नमूद केले. १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत पतसंस्थेमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या मंगलमूर्ती ठेव योजनेला ठेवीदारांनी उस्फुर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सदर सभेत संस्थेचे उपाध्यक्ष श्री.विश्वास खांबे तज्ञ संचालक श्री.प्रमोद रहाटे संचालक श्री.मारुती चिपळूणकर यांनी मनोगत व्यक्त करत पतसंस्थेमध्ये सुरू असलेल्या आधुनिक सोई सुविधांची माहिती दिली व जनकल्याण पतसंस्थेचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांनी केला पाहिजे असे सांगितले.त्याचप्रमाणे सभासद,ठेवीदार,कर्जदार, हितचिंतक यांनी दाखविलेला दृढ विश्वास हाच पतसंस्थेचा पाया आहे असे सांगत कर्मचारी वर्गाच्या कार्यप्रणालीचे त्यांनी यावेळी कौतुक केले.या सभेला संचालक व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिनेश पाटील यांनी केले तर आभार मारुती चिपळूणकर यांनी मानले.