ज्ञानदीप पतसंस्था फ्रँकिंग परवाना प्राप्त करणारी पहिलीच पतसंस्था

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने फ्रँकिंग मशिन वापराचा परवाना प्राप्त
www.banconews.com
ज्ञानदीप पतसंस्था फ्रँकिंग परवाना प्राप्त करणारी पहिलीच पतसंस्थाAvinash
Published on

ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड,मुंबई या संस्थेस नुकताच महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने फ्रँकिंग मशिन वापराचा परवाना मिळाला आहे. संबंधित विभागाचे मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून प्राप्त झाला आहे. ज्ञानदीप पतसंस्था ही फ्रँकिंग परवाना प्राप्त करणारी पहिलीच पतसंस्था ठरली आहे. यामुळे संस्थेच्या ३ लाखपेक्षा जास्त सभासदांची कर्ज वाटप प्रक्रिया जलद होऊन वेळेत आर्थिक गरज पूर्ण केली जाणार आहे. तसेच इतर पतसंस्थाची सोय होणार असून त्यांचेही कर्जवाटप जलद होण्यास मदत होणार आहे. संस्थेने फ्रँकिंग मशीन उपलब्ध करून द्यावी म्हणून वारंवार सहकार विभाग व नोंदणी व मुद्रांक विभाग येथे पत्रव्यवहार केला, संस्थेच्या सतत पाठपुराव्यामुळेच संस्थेस परवाना मिळाला आहे. 

संस्थेने दिनांक ३० जून २०२५ अखेर रुपये ६,७०० कोटींचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री जिजाबा पवार साहेब यांनी दिली. संस्थेच्या एकूण ठेवी ३७७६ कोटी कर्ज २९२४ कोटी मिळून संमिश्र व्यवसाय ६७०० कोटी झाला आहे. सक्षम कर्ज वाटप, कर्ज वसुली मधील सातत्य व निश्चित केलेल्या कर्ज वसुली आणि कर्ज वितरण धोरणांची अंमलबजावणी यामुळेच संस्थेच्या नेट एन. पी. ए चे प्रमाण ० टक्के राखण्यात यश मळिवले आहे. ज्ञानदीपच्या संपूर्ण महाराष्ट्रात ११० शाखा ८ विभागीय कार्यालय ५ सुसज्ज प्रशिक्षण केंद्र असून ९९५ कर्मचारी व १२३८ दैनंदिन ठेव प्रतिनिधी कार्यरत आहेत. ग्राहकांची गरज ओळखून आकर्षक ठेव व कर्ज योजना उपलब्ध करून देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.

संस्थेस नवीन फ्रँकिंग मशीन लायसन्स क्रमांक १७१.२०२५ उपलब्ध करून दिल्याबदद्ल संस्थेचे अध्यक्ष, संचालक, मुंबई जिल्हा बँक, महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक व अध्यक्ष तसेच पतसंस्था नियामक मंडळाचे सदस्य श्री जिजाबा पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री देवेंद्रजी फडणवीससाहेब, उपमुख्यमंत्री, माननीय ना. श्री. एकनाथजी शिंदेसाहेब व श्री. अजितदादा पवारसाहेब, महसूल मंत्री माननीय ना. श्री चंद्रशेखर बावनकुळेसाहेब, सहकार मंत्री माननीय ना. श्री बाबासाहेब पाटीलसाहेब आणि माननीय आमदार श्री. प्रविण दरेकरसाहेब या मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Banco News
www.banco.news