
ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई या अग्रगण्य संस्थेच्या अकलुज शाखेचे नवे स्वमालकीच्या सुसज्ज कार्यालयाचे भव्य समारंभात उद्घाटन करण्यात आले.नव्या वास्तूचे उद्घाटन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. जिजाबा पवार (संचालक, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक; संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बिगर कृषी पतसंस्था फेडरेशन; व नियामक मंडळ सदस्य, महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते करण्यात आले.
समारंभाच्या सुरुवातीस खंडाळा विभागाचे व्यवस्थापक श्री. दत्तात्रय नावडकर यांनी अकलुज शाखेची आर्थिक माहिती दिली. ज्येष्ठ संचालक श्री. एकनाथ जगताप यांनी संस्थेच्या १९७८ पासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला.
स्थापना: ०२ सप्टेंबर १९७८
प्रारंभ: ३०० सभासद व ₹१३,००० भागभांडवल
सध्याचे कार्यक्षेत्र: महाराष्ट्र
शाखा: ११०
विभागीय कार्यालये: ८
प्रशिक्षण केंद्रे: ५
संमिश्र व्यवसाय: ₹६,७०० कोटी (₹३,७७६ कोटी ठेवी व ₹२,९२४ कोटी कर्जे)
अध्यक्ष श्री. जिजाबा पवार यांचे मार्गदर्शन
मा. अध्यक्ष जिजाबा पवार यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, चुनाभट्टी, मुंबई येथे १९७८ साली कामगार वसाहतीत ही संस्था स्थापन झाली. गिरणी कामगारांना सावकारीपासून मुक्त करण्यासाठीची ही कल्पना आज देशातील एक हजार चारशे बहात्तर (१,४७२) नागरी सहकारी बँकांमध्ये ठेवींच्या बाबतीत पंधराव्या (१५) क्रमांकावर आणि महाराष्ट्रातील एकतीस (३१) जिल्हा बँकांमध्ये तेराव्या (१३) क्रमांकावर पोहोचली आहे, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.
संस्थेने कोविड-१९ कालावधीतील मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एकावन्न लाख रुपये (₹५१,००,०००), पूर/दुष्काळग्रस्तांना चौपन्न लाख रुपये (₹५४,००,०००) तसेच जलसंधारण व गुळंब-चांदक ओढा जोडप्रकल्पासाठीही भरीव मदत केली आहे.
या वेळी अकलुज शाखेतील कोटीपती दैनंदिन ठेव प्रतिनिधी व जागामालक श्री. संजय दोशी यांचा सत्कार करण्यात आला.संचालक: श्री. एकनाथ जगताप, श्री. रविंद्र केंजळे, श्री. बाळासाहेब वांजळे, श्री. निवृती मस्के यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक श्री. रविंद्र केंजळे यांनी केले.