
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचे आवाहन केले आहे. त्यानुसार भंडारकवठे येथे कारखाना व बुलढाणा क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण बुलढाणा अर्बनचे कार्यकारी संचालक शिरीष देशपांडे यांनी केले.
भंडारकवठे येथे लोकमंगल कारखान्यावर वृक्षारोपणाचा प्रारंभ करताना, वृक्षारोपणाचा संकल्प केला गेला. त्याची सुरुवात म्हणून दोन एकर क्षेत्रावर आंब्याची रोपे लावण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख होते. यावेळी सोसायटीचे राजू डांगे आदी उपस्थित होते. सरव्यवस्थापिका योगिनी पोकळे, सतीश देशमुख, मंद्रुपचे पीएसआय कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख म्हणाले, दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्याचा परिणाम पर्जन्यमानावर होत आहे. तेव्हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. ज्ञानदान व वृक्षारोपण ही अशी दोन कामे आहेत की त्याचा फायदा समाजाला होतो.