सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

प्राचार्य सतीश होनराव यांनी सहकार कायदा याविषयी सभासदांना व संचालकांना मार्गदर्शन केले.
सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटी
सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटी ची वार्षिक सर्वसाधारण सभा सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष राजेंद्र कांबळे व्यासपीठावर उपाध्यक्ष सुषमा जाधव व अन्य संचालक.
Published on

संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभेची सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीला प्राचार्य सतीश होनराव यांनी सहकार कायदा याविषयी सभासदांना व संचालकांना मार्गदर्शन केले. विद्यमान संचालक मंडळाने थकबाकीचा आकडा लपविला असून नफा कमी होणे ही बाब योग्य नसल्याची खंत सॅलरी बचाव समितीचे नेते यांनी  सभेच्या सुरुवातीला व्यक्त केली.तासगाव शाखेतील अपहाराबद्दल दोषीवर कारवाई करून रक्कम वसूल करा अन्यथा आम्ही संचालकांसह सर्व दोषीवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिलीप शिंदे यांनी दिला. सॅलरीची वार्षिक सभा म्हटले की सर्व मुद्यांवर चर्चा  ठरलेली असते. कालची सभा शांततेत झाली असली तरी, विरोधी गटाकडून बजरंग कदम, दिलीप शिंदे यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. अध्यक्षांनी त्यांना उत्तर दिले.

शासकीय रुग्णालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय वाघोली यांनी कर्जातून कपात होणाऱ्या शेअर्सचा विषय मांडला. दहा टक्के शेअरची रक्कम कर्जदाराच्या खात्यावन पूर्वी जमां असताना पुन्हा नव्याने शेअर्स कपात करू नये अशी सूचन त्यांनी यावेळी केली.संस्थेची शिल्लक व वापरात नसलेल्या जागा भाड्या देण्याबाबतचा विषय सभेपुढे ठेवल होता. त्यावर मुदतीने भाड्याने देता कार्यक्रमासाठी एक दिवसाकरिता त्या जागा भाड्याने देण्याचे सर्वांमध्ये ठरले.संस्थेचे मॅनेजर नंदकुमार लोखं यांनी नोटीस वाचन केले. झाकीर हुसेन चौगुले यांनी प्रास्ताविक केले. जॉईन सेक्रेटरी जब्बार मुलाणी यांनी मागील इतिवृत्त वाचून दाखवले. उपाध्याक्ष  सुषमा जाधव यांनी ताळेबंद वाचन केले. मोरेश्वर रामदासी यांनी रफा तोटा पत्रक वाचून दाखविले, दबडे यांनी अंदाजपत्रक सादर केले.

Banco News
www.banco.news