
आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चा नववा वर्धापन दिन आज संस्थेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला याप्रसंगी उपस्थित सभासदांचे स्वागत संस्थेचे चेअरमन प्रकाश दौंडे यांनी केले.गणपती,चौंडेश्वरी देवी व सिद्धनाथ प्रतिमेचे पूजन संस्थेचे सभासद माणदेश बेकरीचे मालक युवा उद्योजक दत्तात्रय माने देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.संस्थेच्या वतीने फोर व्हीलर स्कार्पिओ वाहनाचे वर्धापन दिनाच्या निमित्ताने वितरण संस्थेचे सभासद दीपक बाळासाहेब देशमुख यांना संस्थेचे पदाधिकारी व संचालक यांच्या हस्ते करण्यात आले वाहनाचे पूजन चेअरमन प्रकाश दौंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
आत्तापर्यंत संस्थेने दोन फोर व्हीलर वाहनांसाठी साठी कर्ज वितरण करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव दत्तात्रय स्वामी यांनी दिली.यापूर्वी आकाश प्रवीण देशमुख यांना अशाच प्रकारचे फोर व्हीलर वाहन कर्ज स्वरूपात वितरित करण्यात आले आहे.याप्रसंगी संस्थेचे संचालक सर्जेराव राक्षे यांची आटपाडी तालुका परीट समाज संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चेअरमन प्रकाश दौंडे यांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक संस्थेचे संचालक विकास भुते यांनी केले.संस्था स्थापन केल्या पासून आज अखेर झालेल्या घडामोडीचा आढावा घेण्यात आला.संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या,यानंतर फोर व्हीलर वाहनाचे मालक दत्तात्रेय माने देशमुख यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सहकार खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी एम बी कुलकर्णी, नामदेव लोखंडे, सतीश भिंगे, महादेव कदम, अनिल दामोदरे, दिलीप सपाटे, अनिल राक्षे, शिवाजी माळी, प्रसाद दीक्षित, अंकुश गाउंदरे ,सुभाष माळी, सुजित पाटील, रुपेश देशमुख, रामचंद्र ऐवळे, दीपक राक्षे ,अनिल राक्षे ,नंदकिशोर जाधव इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
सभासदांपुढे संस्थेचे सचिव दत्तात्रय स्वामी आणि सादर केला यामध्ये ठेवी, कर्जे, गुंतवणूक, थकबाकी,नफा, सिडीरेशो, सी आर आर, एस एल आर इत्यादी माहिती देण्यात आली याप्रसंगी संस्थेचे व्हा चेअरमन दीपक देशमुख संचालक राजेंद्र लाटणे महादेव डोईफोडे महेश देशमुख सर्जेराव राक्षे विकास भुते विलास कवडे रंजना खटावकर मनोज सपाटे सुरज म्हेत्रे मयुरी ऐवळे चंद्रशेखर कवडे संगीता कवडे संभाजी देशमुख अरुण साळुंखे सुजित सपाटे तसेच संस्थेचे कर्मचारी पिग्मी एजंट सभासद ठेवीदार ग्राहक हितचिंतक व्यापारी तसेच आटपाडी शहरातील अनेक पतसंस्थांचे पदाधिकारी संचालक सचिव यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार सचिव दत्तात्रय स्वामी यांनी मानले.