
मराठवाड्यातील अग्रगण्य, लातूर येथील यशवंत नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय, लातूर, औसा व धाराशिव शाखाकरिता खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. त्यासाठी अपेक्षित पात्रता पुढीलप्रमाणे:
शाखाधिकारी: (२ पदे) (लातूर-१, धाराशिव -
पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
प्राधान्य: जे.ए.आय.आय.बी./सी.ए.आय.आय.बी./जी.डी.सी.ए./ तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका.
अनुभव : इतर वित्तीय संस्थेतील अधिकारी/शाखाधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा: किमान ३० ते ५५ वर्षे
ट्रेनी लेखनिक (ऑडिट विभाग): (मुख्य कार्यालय - २)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. कॉम, एम. कॉम, GDC&A व समकक्ष यापैकी कोणतीही एक पदवी धारण केलेली असावी.
प्राधान्य : बँकिंग क्षेत्रातील ऑडिट, कंप्लायन्स, RBI रिटर्न्स बाबतचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा: २२ ते ४० वर्षे (दि.१-१-२०२५ पर्यंत)
मार्केटिंग ऑफिसर : (४ पदे) (लातूर शाखा २, धाराशिव शाखा -२)
पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/ पदविका व संगणकाचे ज्ञान आवश्यक. प्राधान्य- शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग / सहकार/ कायदेविषयक पदविका. अनुभव : सहकारी बँकेत इन्शुरन्स व मार्केटिंग ऑफिसर म्हणून काम केलेचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा: किमान ३० वर्षे ते ४० वर्षे.
तरी वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (सी. व्ही), अपेक्षित पद व शाखा, शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, ओळखपत्र, फोटो इ. कागदपत्रांसह मुख्य कार्यालयाच्या पत्यावर स्वतः, टपालाने किंवा बँकेच्या hr@yashwantbanklatur.com या ई-मेल आयडी वर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांत पाठवावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावा. कर्मचारी नेमणूक ही शासनाच्या (सहकार विभाग) नियमांच्या अधीन राहून करण्यात येईल.
नोट - वरील पदाकरिता भरती ही करार पद्धतीने होणार असून मानधन हे करार तत्वानुसार देण्यात येणार आहे.
दि. ३०/०६/२०२५
यशवंत नागरी सहकारी बँक लि. लातूर
मुख्य कार्यालय: उषाकिरण कॉम्प्लेक्स, बार्शी रोड, लातूर (महाराष्ट्र ) ४१३ ५१२
फोन क्र.०२३८२-२२२१४४/२२२१४२, वेबसाईट: https://yashwantbanklatur.com