
विश्वेश्वर सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने शेड्यूल्डचा दर्जा देत बँकेला विश्वासहार्यता व जबादार बँकर म्हणून प्रमाणपत्र दिलेले आहे. शेड्युल्ड बँक म्हणून दर्जा मिळालेली हि देशातील ५० वी तर पुण्यातील तिसरी बँक आहे.विश्वेश्वर सहकारी बँक हि नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात वेगाने प्रगती करणारी व ग्राहकांना सातत्याने सुविधा देण्यात अग्रेसर असणारी ठरली आहे.
सद्यस्थितीत बँकेने २२०० कोटींच्या ठेवींचा टप्पा गाठला असून ३१ मार्च २०२६ अखेर अडीच हजार कोटींच्या ठेवींचे बँकेचे उद्दिष्ट आहे. पुढील चार वर्षात १०हजार कोटींच्यावर ठेवी असणाऱ्या नागरी बँकांमध्ये स्थान मिळवण्याचा बँकेचा संकल्प आहे.यापूर्वी बँकेने २०११ साली कर्नाटकातील निपाणी अर्बन सौहार्द सहकारी बँकेचे विलीनीकरण करूंन मल्टिस्टेट सहकारी बँकेचा दर्जा प्राप्त केलेला होता. रिझर्व्ह बँकेच्या निकषांचे पालन केल्यानेच बँकेस हा प्रतिक्षित शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळालेला आहे.
शेड्युल्ड बँकांना व्यवसायाच्या संधी
· रिझर्व्ह बँकेकडून रिफायनान्सची सवलत
· परदेशी बँकांशी सामंजस्य करारातून आयात - निर्यात व्यवहार
· ऑनलाईन, मोबाईल बँकिंग, बँक गॅरंटी, मरकॅन्ट बँकिंग सुविधा
· बांधकाम व्यावसायिकांची रेरा खाती उघडून घेता येतात