
वसई : वसई जनता सहकारी बँक दरवर्षी आपल्या धर्मादाय निधीचे वाटप ठाणे व पालघर जिल्हयातील दुर्गम आदिवासी, वनवासी परिसरात शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात करीत असते.
या नुसार सन २०२४-२५ च्या धर्मादाय निधी वाटपाचा कार्यक्रम नुकताच डहाणू तालुक्यातील कोसबाड येथील नूतन बाल शिक्षण संघ या शैक्षणिक संकुलात पार पडला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डहाणूचे आमदार मा. विनोदजी निकोले व डहाणू जनता बँकेचे अध्यक्ष मा. मिहीर शहा उपस्थित होते. सदर धर्मादाय निधी वाटप कार्यक्रमात
नूतन बाल शिक्षण संघ, कोसबाड, शिक्षण प्रसारक मंडळ , विद्यार्थी वसतीगॄह, आशागड, आदिवासी विद्यार्थी वसतीगॄह, आशागड, आदिवासी सेवा मंडळ, कन्या छात्रालय, मोखाडा, प्रगती प्रतिष्ठान, जव्हार, वनवासी कल्याण केंद्र, तलासरी, श्री गुरूदेव बहुउददेशिय सामाजिक संस्था, जव्हार, यशवंत दामोदर मिस्त्री चॅरिटेबल ट्रस्ट, नौपाडा, ठाणे व विठ्ठलनाथ सेवासंचालित गीता ग्रंथालय, विरार आदी संस्थांना आर्थिक मदतीचे धनादेश बँकेचे अध्यक्ष मा.श्री.महेश देसाई व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक व उपस्थितांचे स्वागत बँकेचे अध्यक्ष मा. देसाई यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा मा. अध्यक्षांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व स्मॄतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.