
सटाणा, नाशिक - येथील सटाणा मर्चंट्स को-ऑप बँकेच्या वतीने "आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५" अंतर्गत "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत बँकेच्या चेअरमन कल्पना येवला यांच्या हस्ते नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. येथील जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या परिसरात सटाणा मर्चंट्स को-ऑप बँकेच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वानी वृक्षसंवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वेळी व्हा. चेअरमन चंद्रकात सोनवणे, माजी चेअरमन श्रीधर कोठावदे, संचालक पंकज ततार, जयवंत येवला, कैलास येवला, स्वप्नील बागड, सचिन कोठावदे, डॉ. व्ही. के येवलकर, महेश देवरे, अभिजित सोनवणे, रमनलाल छाजेड, प्रवीण बागड, भास्कर अमृतकार, रुपाली कोठावदे, दिलीप येवला, जगदीश मुंडावरे, प्रकाश सोंनग्रा, विजय भंगडीया, डी. व्ही. कापुरे, पीयूष येवला, मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास बागडे, भरत पवार (वसुली अधिकारी) व पी. आर. अमृतकर (लेखापाल) उपस्थित होते.