सारस्वत बँक मुक्त आणि दूरस्थ शिक्षणासाठी देणार कर्ज

शैक्षणिक कर्जात परदेशातील अभ्यासक्रमांचा समावेश .
सारस्वत बँक मुक्त आणि दूरस्थ शिक्षणासाठी देणार कर्ज
Avinash
Published on

सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली सारस्वत सहकारी बँक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शुल्क १०० टक्के वित्तपुरवठा आणि शून्य प्रक्रिया शुल्कासह ८.५० टक्के व्याजदराने पूर्व-मंजूर शैक्षणिक कर्ज देणार आहे. तर  मुलींना ८ टक्के विशेष व्याजदराने शैक्षणिक कर्ज मिळेल.

१९०८ साली स्थापन झालेल्या  सारस्वत सहकारी बँकेने  देशातील सर्वांत मोठी सहकारी बँक असा लौकिक मिळवलेला आहे. भारतीय सहकारी बँकिंग क्षेत्राकडून अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. सध्या या बँकेच्या ८ राज्यांत ३११ शाखा कार्यरत असून ३५० हुन अधिक एटीएम आहेत. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यातही या बँकेने नेहमीच  पुढाकार घेतलेला आहे.

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे, की त्यांच्या या शैक्षणिक कर्ज योजनेत (भारत आणि परदेशात) ऑनलाइन अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या योजनेत बँक परकीय चलन खरेदी किंवा परकीय चलन पाठवण्याच्या कमिशनवर २५ टक्के सूट देखील देणार आहे.

Banco News
www.banco.news