श्री रुक्मिणी सहकारी बँकेत विविध पदांसाठी नोकरीची संधी

मुख्य कार्यकारी अधिकारी सह इतर पदांवर भरती
श्री रुक्मिणी सहकारी बँक श्रीगोंदा मध्ये नोकरीची संधी
श्री रुक्मिणी सहकारी बँक श्रीगोंदा मध्ये नोकरीची संधी श्री रुक्मिणी सहकारी बँक श्रीगोंदा
Published on

 श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर- ४१३ ७०१ (महाराष्ट्र) या नागरी सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक / उप सरव्यवस्थापक / सहाय्यक सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी / शाखाधिकारी / कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, ऑडिट ऑफिसर / ऑडिट कंम्प्लायन्स ऑफिसर, रिलेशनशिप ऑफिसर, संगणकीय अधिकारी (आय. टी.) लीगल ऑफिसर, इ. पदे भरावयाची आहेत, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता / पात्रता खालीलप्रमाणे :-

अ.नं.१)  पदनाम: मुख्य कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक अर्हता : १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी प्राधान्य- १ JAIIB CAIIB / Diploma in Banking and Finance, Higher Diploma in Co-op Management / GDC & A उत्तीर्ण २. CA/CS/ ICWA/ MBA (FINANCE) ३. शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेतील बँकिंग/सहकार / कायदेविषयक पदविका

अनुभव: बँकिंग क्षेत्रातील मध्यम / वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील कामकाजाचा किमान १० वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा: ४० वर्षे

अ.नं. २)  पदनाम: सरव्यवस्थापक / उपसरव्यवस्थापक / सहाय्यक सरव्यवस्थापक

शैक्षणिक अर्हता: आवश्यक १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी २. एम. एस. सी. आय. टी / समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य- १. JAIIB / CAIIB/Diploma in Banking and Finance / Higher Diploma in Co-op Management / GDC&A उत्तीर्ण २. CA/CS / ICWA/ MBA (FINANCE) ३. पदव्युत्तर पदवी, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका.

अनुभव: बँक / इतर वित्तीय संस्थेमधील वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा: ३५ वर्षे

अ.नं. ३) वरिष्ठ अधिकारी / शाखाधिकारी / कर्ज अधिकारी

शैक्षणिक अर्हता : आवश्यक १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी २. एम. एस. सी. आय. टी / समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य- १. JAIIB / CAIIB/ Diploma in Banking and Finance / Higher Diploma in Co-op Management / GDC&A उत्तीर्ण २. CA/CS / ICWA/ MBA (FINANCE) ३. पदव्युत्तर पदवी, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका

अनुभव: बँक / इतर वित्तीय संस्थेमधील वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा: ३० वर्षे

अ.नं. ४) वसुली अधिकारी

शैक्षणिक अर्हता :आवश्यक १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी २. एम. एस. सी. आय. टी / समतुल्य प्रमाणपत्र ३. सहकारी बँकेतील सरफेसी, १०१ व ९१ खालील कारवाईचा व कोर्ट कामकाजाचा अनुभव प्राधान्य- १.G.D.C & A उत्तीर्ण, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका

अनुभव: सहकारी बँक / वित्तीय संस्थेमधील वसुली कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा: ३० वर्षे

अ.नं. ५) ऑडिट ऑफिसर / ऑडिट कंम्प्लायन्स ऑफिसर

शैक्षणिक अर्हता : १. B.com, /MBA/ JAIIB / CAIIB, २. एम. एस. सी. आय. टी / समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य - १. G.D.C. & A उत्तीर्ण किंवा शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका

अनुभव: सहकारी बँक / वित्तीय संस्थेमधील वसुली कामकाजाचा किमान ३ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा: २५ वर्षे

अ.नं. ६) रिलेशनशिप ऑफिसर

शैक्षणिक अर्हता : आवश्यक १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी, मराठी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. २. एम. एस. सी. आय. टी / समतुल्य प्रमाणपत्र ३. उमेदवारास बँकिंग व कर्ज विभागातील उत्पादने ( LOAN PRODUCTS ) वितरणाची माहिती आवश्यक ४. भेट देणे व कर्जाची नवीन खाती आणणे, तसेच मार्केटिंग कामकाजाचा अनुभव आवश्यक

अनुभव: सहकारी बँक / वित्तीय संस्थेमधील किमान ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा: २५ वर्षे

अ.नं. ७) संगणकीय अधिकारी (आय .टी.)

शैक्षणिक अर्हता : कॉम्प्युटरमधील B.C.S./ B.E./ B.Tec./ M.C.S. / M.C.A./ M.C.M./ M.B.A. (I.T.) पदवी

अनुभव: डेटासेंटर, नेटवर्किंग व मायक्रोसॉफ्ट व बँकिंग क्षेत्रातील आय. टी. विभागांमधील ३ वर्षे अनुभव

वयोमर्यादा: २५ वर्षे

अ.नं. ८) लिगल ऑफिसर

शैक्षणिक अर्हता : आवश्यक १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / पदव्युत्तर पदवी, L.L.B.

२ कायदेविषयक पदविका ३. सहकारी बँकेतील सरफेसी, १०१ व ९१

खालील कारवाईचा व कोर्ट कामकाजाचा अनुभव

अनुभव: सहकारी बँक / वित्तीय संस्थेमधील किमान ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा: २५ वर्षे

वरील पदांसाठी शैक्षणिक अर्हता / पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपला संपूर्ण माहिती भरलेला अर्ज (सी.व्ही.) शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह बँकेच्या श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा, मु. पो. 'सिटी प्राईड बिल्डिंग, दौंड-जामखेड रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर- ४१३ ७०१ (महाराष्ट्र) या पत्त्यावर ही जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत पाठवावा.

दिनांक :- ०५/०७/२०२५

स्थळ : - श्रीगोंदा:- फोन क्र. : ०२४८७/२२०५५०, २२०७५० ई-मेल: hoshrigonda@shrirukminibank.com

Banco News
www.banco.news