पंचगंगा बँक कोल्हापूरची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

सभासदांना १०% लाभांशाची घोषणा
श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक लि. कोल्हापूरची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक लि. कोल्हापूरची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक
Published on

कोल्हापूर : येथील श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक लि. कोल्हापूरची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही. टी. पाटील सभागृह येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर  बँकेचे अध्यक्ष ॲड. श्री. रामचंद्र टोपकर यांनी बँकेच्या चौफेर प्रगतीचा आढावा  घेत असताना ग्राहक व सभासद यांच्या सहकार्याने बँकेने मिश्र व्यवसायाचा ६०० कोटींचा टप्पा पार केल्याचे सांगितले. बँकेने ३७४ कोटी ठेवी व २३५ कोटी कर्जाचा आकडा गाठला आहे. यावर्षी देखील बँकेला नेट एनपीए ०% राखण्यात व ऑडिट वर्ग अ  ठेवण्यात यश मिळाले आहे. याबद्दल ग्राहक व सभासदांचे आभार मानले. सभासदांना १०% लाभांशाची घोषणा केली. सन २०२५-२६ मध्ये बँकेची पाचवी शाखा कराड येथे सुरु करत असून ज्येष्ठ व अनुभवी संचालकांच्या मार्गदर्शनाखाली सन २०३० अखेर रु. ११०० कोटी मिश्र व्यवसाय गाठण्याचे उद्दिष्ट बँकेने ठरविले आहे. त्यास सर्व ग्राहक,सभासद व हितचिंतक यांनी साथ देण्याचे आवाहन अध्यक्षांनी  केले.

बँकेने वार्षिक सभेस येणाऱ्या सर्व सभासदांचे स्वागत सुवासिक अत्तर लावून व चाफ्याचे फूल देऊन केले. अहवाल वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दीपक फडणीस यांनी केले. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन महाव्यवस्थापक श्री. सुशील कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शनाचे काम मा. उपाध्यक्ष श्री.भगवान काशीद यांनी केले.

यावेळी बँकचे संचालक श्री.राजाराम शिपुगडे, डॉ. सौ. माधुरी कुलकर्णी, श्री. भालचंद्र साळोखे, श्री. उपेंद्र सांगवडेकर, श्री. विजय चव्हाण, श्री. केशव  गोवेकर, श्री.सुनील पेठे, श्री. राकेश कापशीकर, सौ.अंजली वालावलकर, श्री.उमेश भोसले, श्री.राजगोंडा पाटील, श्री. सौरभ मुजुमदार, डॉ. सौ. मधुरा कुलकर्णी  तसेच व्यवस्थापन मंडळ (BoM) सदस्य श्री. दिपक सांगलीकर, श्री. प्रशांत कामत, ॲड. श्री. मंदार परांजपे उपस्थित होते.

  यावेळी राजन झुरळे, संतोष घोडगिरीकर, राजेश नाईक, अमित साळुंखे, माणिकलाल विभूते, सुरेंद्र कुलकर्णी, संजय वाघापूरकर, अंकुश वाघापूरकर, किरण कर्नाड, हेमंत आराध्ये, मोहन खडके, श्री. कांदेकर या सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. 

Banco News
www.banco.news