
कोल्हापूर - येथील कै. ॲड. शामरावजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या व सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनची सन २०२५ ते २०३० सालासाठीची पंचवार्षिक निवडणूक श्री वारणा बँकेचे अध्यक्ष मा. निपुणराव कोरे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. संस्थेच्या आजअखेर सर्व निवडणुका बिनविरोध पार पडलेल्या आहेत. निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक खालीलप्रमाणे.
सर्वसाधारण प्रतिनिधी-
श्री. निपुण विलासराव कोरे- श्री वारणा सह. बँक लि,
श्री. शिरीष दत्तात्रय कणेरकर - दि कोल्हापूर अर्बन बँक,
श्री. सुर्यकांत बाबुराव पाटील- श्री वीरशैव बँक,
श्री. विठ्ठल बाबुराव मोरे- श्री भरत बँक, जयसिंगपूर,
श्री. राजाराम शंकर शिपुगडे- श्री पंचगंगा बँक,
श्री. महेंद्र रामराव शिंदे - ॲड. शामरावजी शिंदे सत्यशोधक बँक,
ॲड. राजेंद्र प्रभाकर किंकर- श्री महालक्ष्मी बँक,
श्री. मारुती पांडुरंग पाटील- राजे बँक, कागल,
ॲड. प्रकाश पांडुरंग देसाई - श्री यशवंत सह. बँक,
सीए- मंदार महेश धर्माधिकारी- गणेश बँक, कुरुंदवाड.
महिला राखीव प्रतिनिधी-
सौ. विजया बाळकृष्ण जाधव - कोल्हापूर महिला बँक -
सौ. दिपाली प्रदीप मिसाळ - नृसिंह सरस्वती बँक, आसुर्ले पोर्ले.
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी-
श्री. संजय आण्णा देसाई- पार्श्वनाथ बँक
अनुसूचित जाती / जमाती प्रतिनिधी-
श्री. रविंद्र नरसिंगा व्हटकर- दि कमर्शिअल बँक
विमुक्त जाती / भटक्या जमाती अथवा वि.मा.प्र. प्रतिनिधी-
श्री. रविंद्र वसंतराव पंदारे - राजर्षी शाहू गर्व्ह. सर्व्हन्टस बँक
यावेळी असोसिएशनतर्फे नमूद करण्यात आले की , "२०२० नंतर बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये बदल झाल्यामुळे नागरी सहकारी बँकांच्या कामकाजामध्ये बरीच स्थित्यंतरे घडणार आहेत. त्यामुळे बँक असोसिएशनच्या कामाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. या असोसिएशनच्या ४४ नागरी सहकारी बँका सदस्य असून, असोसिएशन त्यांच्या सेवकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे."
ही निवडणूक बिनविरोध पार पाडणेसाठी सदस्य असलेल्या सर्व बँकांनी सहकार्य केलेले असून विभागीय सहनिबंधक मा. डॉ. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक मा. निलकंठ करे, निवडणूक निर्णय अधिकारी मा. प्रेरणा शिवदास, सहकारी अधिकारी मा. नितीन माने आणि इतर अधिकारी यांनीही सहकार्य केलेबद्दल असोसिएशनने त्यांचे आभार मानले. यावेळी असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल नागराळे उपस्थित होते.