त्रिभुवन सहकारी विद्यापीठात कुलगुरू पदावर निवडीची संधी

पात्र, अनुभवी उमेदवारांकडून मागविले अर्ज
Tribhuvan University
"त्रिभुवन" सहकारी विद्यापीठात (TSU) कुलगुरू पदावर निवडीची संधी "त्रिभुवन" सहकारी विद्यापीठ
Published on

गुजरामधील आणंद येथील "त्रिभुवन" सहकारी विद्यापीठात (TSU) पहिल्या कुलगुरूंची नियुक्ती करावयाची असून खालीलप्रमाणे पात्रता व अनुभव असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

 कुलगुरू (शैक्षणिक व प्रशासकीय प्रमुख) म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता :

  •  उच्चतम दर्जाची क्षमता, प्रामाणिकपणा, नैतिकता आणि संस्थात्मक बांधिलकी असणे आवश्यक आहे.

  • खालीलपैकी कोणत्याही क्षेत्रात सिद्ध शैक्षणिक किंवा विद्वत्तापूर्ण योगदानासह किमान 10 वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती कुलगुरूपदासाठी पात्र असेल :

  1. उच्च शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक पदावर काम केल्याचा अनुभव

  2. प्रतिष्ठित संशोधन संस्था किंवा शैक्षणिक प्रशासनिक संस्थेत वरिष्ठ पदावर काम केल्याचा अनुभव

  3. उद्योग, सहकार क्षेत्र, सार्वजनिक प्रशासन, सार्वजनिक धोरण किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांत वरिष्ठ स्तरावर काम केल्याचा अनुभव

  • अर्जाच्या अंतिम दिनांकाच्या आधी उमेदवाराची वयोमर्यादा ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

वेतन आणि सेवा अटी :

  • वेतन हे त्रिभुवन सहकारी विद्यापीठाच्या नियम व अधिनियमांनुसार निश्चित केलेल्या स्तर - १७ (रु. २,२५,000/- प्रति महिना निश्चित) प्रमाणे राहील.

  • सेवा अटी TSU अधिनियम, २०२५ आणि विद्यापीठाच्या नियम व अधिनियमांनुसार ठरवल्या जातील.

नियुक्ती प्रक्रिया : कुलगुरूची नियुक्ती ही TSU अधिनियम, २०२५ आणि विद्यापीठाच्या नियमांनुसार, केंद्र सरकारने या हेतूसाठी स्थापन केलेल्या शोध व निवड समितीने शिफारस केलेल्या तीन नावांच्या पॅनेलमधून केली जाईल.

सदर जाहिरात पुढील संकेतस्थळांवरही  उपलब्ध आहे:

https://www.education.gov.in

https://www.cooperation.gov.in

https://www.irma.ac.in

उमेदवारांनी केवळ शिक्षण मंत्रालयाच्या समर्थ पोर्टलवर खालील लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करावा :

👉 https://vcrec.samarth.ac.in/index.php/

वरील लिंक १२.०७.२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू होईल आणि ११.०८.२०२५ रोजी सायं. १७:०० वाजेपर्यंत सक्रिय राहील. 

Banco News
www.banco.news