
सहकारी बँक क्षेत्रात कौशल्यप्राप्त व कार्यक्षम CEO तयार करण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून Advanced Diploma in Banking (CEO Specialisation) हा एक वर्षाचा डिप्लोमा जून २०२५ मध्ये सुरु झाला आहे.
बँकिंग क्षेत्रातील तीव्र स्पर्धेत सहकारी बँकांचे अस्तित्व टिकवून त्यांना स्पर्धा सक्षम बनवून नागरी सहकारी बँकांची वाटचाल सुरळीत करण्यासाठी त्यांची आर्थिक स्थिती वृद्धिंगत करण्यासाठी पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोशिएशन आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त पुढाकारातून ऍडव्हान्स डिप्लोमा इन बँकिंग फॉर सीईओ हा पदविका अभ्यासक्रम जूनपासून सुरु होत आहे.
सहकारी बँकात कार्यक्षम सीईओची कमतरता अनेक वर्षांपासून भासत आहे. या बँकात या पदाची नेमणूक अंतर्गत पदोन्नतीनुसार होते; परिणामी कर्ज, ठेवी, एचआर, गुंतवणूक या विभागात बरेच वर्ष कार्यरत अधिकारी पदन्नोतीनुसार सीईओ पदावर नेमले जातात. कामाच्या ताणामुळे त्यांना कामात मदत घ्यावी लागते. वस्तुतः रिझर्व्ह बँकेने सीईओ पदासाठी विशेष निकष ठरवून दिलेले आहेत. नागरी बँकेकडे कौशल्याधारित मनुष्यबळ नसल्याने रिझर्व्ह बँकेला अपेक्षित कॉर्पोरेट अधिकारी या बँकेतून मिळत नाहीत. अशी तक्रार सातत्याने होत आहे. या समस्येंचा विचार करता असोशिएशने दोन तीन वर्षे या समस्येवर अभ्यास केला. त्यातून निष्कर्ष असा निघाला की, जर बँक अधिकाऱ्यांनाच सीईओ पदासाठी तयार केले तर संबधित बँकेला त्याचा फायदा होऊ शकतो. बॅंकेच्या प्रत्येक विभागाची माहिती असणारा अधिकारी तयार करण्याचे नियोजन करून हा अभ्यासक्रम आखण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम ठरवण्यासाठी एक समिती नेमण्यात आली ज्यात निवृत्त सीईओ, प्राध्यापक, सनदी लेखापाल, वकील यांचा समावेश होता. या समितीने अभ्यासक्रम तयार केला व सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी चर्चा केली, विद्यापीठाला हा अभ्यासक्रम उपयुक्त वाटला त्यांनी हा अभ्यासक्रम मान्य करत करार केला आहे. हा अभ्यासक्रम वाणिज्य विभागात चालणार असून तो १ वर्षांचा आहे. परीक्षा घेऊन त्यावर प्रमाणपत्रही दिले जाईल. ग्रामीण भागातील बँकेत कौशल्यप्राप्त व कार्यक्षम सीईओ काम करण्यास तयार नसतात. जर बॅँकेतीलच अधिकारी प्रशिक्षण घेऊन तयार झाले तर ते सीईओ पदावर काम करू शकतील असे कुलगुरू पराग काळकर यांनी सांगितले.
नागरी सहकारी बँकांमध्ये प्रभावी नेतृत्व आणि प्रशासन वाढवणे
CEO पदावरील कौशल विकासासाठी सुसंवाद, धोरणात्मक समज, डिजिटल बँकिंग व धोका व्यवस्थापन
अडचणी: लहान व मध्यम सहकारी बँकांमध्ये CEO पदासाठी पात्र नेतृत्वाची कमतरता होती
उद्दीष्ट: व्यवस्थापन कौशल्ये वाढवून, संस्थात्मक विश्वासपात्रता आणि कार्यक्षमता वाढवणे
निवृत्त RBI अधिकारी
अनुभवी बँकिंग व्यावसायिक
CA आणि IT, मार्केटिंग तज्ञ
प्रमाणपत्र: विद्यापीठ परीक्षेनंतर SPPU कडून प्रदान केले जाईल