बेतिया सहकारी बँकेची आर्थिक प्रगती, बिहारमध्ये दुसरे स्थान

बेतिया सहकारी बँकेचा NPA कमी, उपमुख्यमंत्र्यांकडून सन्मानित
बेतिया नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्ष,  व्यवस्थापकीय संचालकांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव
बेतिया नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव बेतिया नागरी सहकारी बँक
Published on

बेतिया, बीपी. पश्चिम चंपारण सहकारी बँकेने ठेवीत १००% वाढ केलेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार बेतिया नागरी सहकारी बँकेचा NPA ४.८२% झालेला आहे. जो  रिझर्व्ह बँकेच्या ५% च्या मानकापेक्षा कमी आहे. त्यामुळे बेतिया नागरी सहकारी बँकेला नाबार्डने बिहार राज्यात दुसरे स्थान दिलेले आहे. यामध्ये बेगुसराय सहकारी बँक पहिल्या तर आरा सहकारी बँक बँकेला तिसरे स्थान मिळालेले आहे. बेतिया नागरी सहकारी बँकेची उत्तम आर्थिक प्रगती आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री विजय कुमार सिंह यांनी बेतिया नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष कुमार गुप्ताआणि व्यवस्थापकीय संचालक अजय कुमार भारती यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे.     

Banco News
www.banco.news